कोल्हापुरातल्या कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे. तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांनाही वरणगे पाडळी येथून अटक करण्यात आली असून संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत.
अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टर दिपाली ताईगडे, सुप्रिया माने आणि धनश्री भोसले या तिघींना पोलिसांनी अटक केली. आज या तिघींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी करवीर पोलिस अधिक तपास करत असून आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आले आहे.
कोल्हापुरातील कळंबा परिसरात गर्भलिंग निदान करून गर्भवताच्या गोळ्या देणाऱ्या बीएएमएस महिला डॉक्टरच्या श्रद्धा हॉस्पिटलवर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गुरूवारी सायंकाळी छापा टाकला. याप्रकरणी डॉक्टर दिपाली सुभाष ताईंगडेला ताब्यात घेण्यात आले होते. या पथकाने रोख रकमेसह गर्भपाताच्या गोळ्यांचे पाच किट जप्त केले होते. तर कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळीत गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्यां महिलांना देखील पथकाने ताब्यात घेतलं.
आरोग्य विभागाच्या पथकाने वरणगे इथल्या एका घरात सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलं. सुप्रिया माने आणि धनश्री भोसले यांना गोळ्यांची विक्री करताना तीन किटसह पकडण्यात आले. महत्वाच्या म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा कसून तपास सध्या आरोग्य विभागाकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.