Shaktipeeth Expressway: कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गावरून महायुतींचे नेते आमनेसामने; एकमेंकांविरोधात थोपटले दंड

Shaktipeeth Expressway: समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यातील शक्तिपीठांना जोडणारा सरकारचा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणेज शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र या महामार्गाला विरोध केला जातोय.
Shaktipeeth Expressway
Shaktipeeth ExpresswayJagran
Published On

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केलाय. त्यामुळं महामार्ग कोल्हापुरातून जाणार नाही, असे स्पष्टीकरण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलंय.

Shaktipeeth Expressway
Kolhapur News: परीक्षा देऊन घरी येताना काळाचा घाला, ऊसाचा ट्रॅक्टर अंगावरून गेला; कोल्हापुरात हळहळ

अशातच आता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र या शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ बैठक घेऊन या प्रकल्पासंदर्भात असणाऱ्या शंकांचं निरसन केलं जाईल, असं म्हणत शक्तिपीठ महामार्गाबाबत जणू ग्रीन सिंगल दिलाय. यामुळे कोल्हापुरातल्या महायुतीमधील नेत्याच्या मध्ये शक्तीपीठ महामार्गावरून वाकयुद्ध रंगले आहे.

कसा असेल शक्तीपीठ एक्स्प्रेसवे?

शक्तीपीठ महामार्गावरून महायुतींचे नेते आमने-सामने

शक्तिपीठ महामार्ग मुद्द्यावरून कोल्हापुरातील वातावरण तापलं

805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार??

शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा येणार खर्च

कोल्हापूर - अंबाबाई

तुळजापूर - तुळजाभवानी

नांदेड - माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठ ना जोडणारा हा महामार्ग असणार

या महामार्गामुळे 12 जिल्ह्यातील 27 हजार 500 एकरांची जमीन हस्तांतरित होणार

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमकच

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यातील शक्तिपीठांना जोडणारा सरकारचा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणेज शक्तीपीठ महामार्ग. मात्र या शक्तीपीठ महामार्गाला होत असलेला विरोध संपता संपत नाही. शिवाय आता तर कोल्हापुरातील महायुती मधील नेत्यांमध्येच या शक्तिपीठ महामार्ग संदर्भात वेगवेगळ्या भूमिका दिसू लागलेत. लोकसभेला महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने काही काळ शक्तीपीठ महामार्ग संदर्भात शांततेची भूमिका घेतली.

Shaktipeeth Expressway
Krishnaaraj Mahadik: रिंकू आणि भाजप खासदाराच्या मुलाचा फोटो व्हायरल, चाहते झाले सैराट, म्हणाले झिंग झिंग झिंगाट

विशेष म्हणजे विधानसभेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा हा महामार्ग होऊ देणार नाही असा पवित्रा घेत हा मार्ग रद्द झाल्याच GR देखील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुश्रीफ यांनी दाखवला. मात्र निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता पुन्हा शक्तिपीठसाठी हालचाली सुरू झाली.

मात्र या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून वगळण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी महायुतीतीलच आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात क्रेडाईसह शहरातील विविध संघटनांसोबत शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देत चर्चा केलीय.

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक

कोल्हापुरातल्या 6 तालुक्यातील 59 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे.

मात्र हसन मुश्रीफांनी यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील हा मार्ग जाणार असल्याचा स्पष्ट केले

आमदार राजेश क्षीरसागर यांनी या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याने वादाला तोंड फुटलं.

दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा दिला असला तरी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र आपला विरोध कायम ठेवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही. याची अधिसूचना आधीच काढली आहे. लोकसभा निवडणुकीत या महामार्गामुळे फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे.राजेश क्षीरसागर हे शहरात राहणारे आमदार आहेत. पण आम्ही ग्रामीण भागातील आहोत. ग्रामीण भागात या महामार्गाला विरोध होत आहे. असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

राजेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती देखील आक्रमक झाली आहे. या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाचे सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तयार केलेली सुजलाम सुफलाम जमीन विदर्भासारखे भकास करायची आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोल्हापुरात प्रचारादरम्यान शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार नाही असे म्हटले होते आता त्यांच्याच पक्षातील नेते त्यांना खोटं ठरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही महामार्ग कोल्हापुरातून जाऊ देणार नाही भूमिका शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने घेतलाय

कोल्हापुरात महायुतीतील नेत्यांमध्येच शक्तिपीठ महामार्ग संदर्भात मतमतांतर असल्याने आणि राजेश क्षीरसागर यांनी बिल्डर आणि कंत्राटदारांसोबत घेतलेल्या बैठकीने नव्या वादाला तोंड फोडलय... यामुळे हा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार की शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती याला हद्दपार करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com