Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar On ED Action: 'आमच्यावर धाड टाकू नका, थेट गोळी घाला', शरद पवारांचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar Kolhapur Sabha: ''राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात बोलले म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकलं. आता दोन महिन्यासाठी जामीन मिळालेला आहे. मलाही ईडीसी नोटीस आली. मी ईडीला म्हणलो मीच येतो. ज्या बँकेत मी कर्ज घेतलं नाही. माझी ठेव नाही, अशा बँकेची मला नोटीस पाठवली. त्यावेळी एकानेही माझी साक्षी घेण्याची तयारी दाखवली नाही. संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख घाबरलेले नाहीत'', असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.

कोल्हापूर येथील राष्ट्रवादीच्या सभेत ते असं म्हणाले आहेत. ईडी कारवाई आणि अजित पवार गटाला लक्ष्य करत शरद पवार म्हणाले की, कोल्हापूर ही शूरांची नगरी आहे. मात्र इडी आली आणि भलतंच घडलं. त्यांच्या पत्नीने (हसन मुश्रीफ) आम्हाला गोळ्या घाला, असं ठणकावून सांगितलं होतं. धाडस दाखवलं होतं. मात्र त्या कुटुंबाच्या प्रमुखाने इडीसोबत जाणं पसंत केलं, असं मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता पवारांची टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले की, ''मणिपूरमध्ये दोन समाजा संघर्ष आहे. आया बहिणींची धिंड काढली जात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी महिलांना सुरक्षा दिली नाही. आया बहिणींना सुरक्षा देण्याची ताकद ज्यांच्यात नाहीत, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही.'' (Latest Marathi News)

शरद पवार पुढे मानले की, ''२०२४ हे निवडणुकीचं वर्ष आहे, मत देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आपण बारकाईनं लक्ष ठेवू, सत्तेचा गैरवाप कुणी केला? शेतकऱ्यांचं नुकसान कोणी केलं, कांद्याचं नुकसान कोणी केलं? ऊस उत्पादकांना अन्यायकारक वागणूक कोणी दिली? तरुणांना बेरोजगारीत कुणी ढकललं? या सर्व गोष्टींचा आढावा आपण घेऊ.

पवार म्हणाले, ''मोदी सरकारने या कांद्यावर प्रचंड कर बसवलेला आहे. बाहेर देशात या कांद्याला ग्राहक मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केली. पण केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : महाविकास आघाडीत मोठा भाऊ छोटा भाऊ असं काही नसेल: जयंत पाटील

Harbhajan Singh: 'हे चूकीचं आहे..', हार्दिक पंड्याला कॅप्टनीवरुन काढल्यामुळे हरभजन सिंग भडकला

Maval News: 'प्रत्येकजण मरायला आलाय..' सुनिल शेळके विरोधकांवर संतापले, अजित पवारांनी कान टोचले; मावळात हायहोल्टेज ड्रामा!

Amitabh Bachchan : दिवसाला २०० सिगारेट ओढायचे 'बिग बी'; मुंबईत येताच सुटलं व्यसन, कसं? स्वतःच केला खुलासा

Arbaz- Nikki: बाईsss काय हा प्रकार!, अरबाजने निक्कीला चक्क उचलून घेतलं

SCROLL FOR NEXT