Kolhapur Mayor Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Mayor: कोल्हापूर महापालिकेचा महापौर ठरला! भाजपच्या रुपाराणी निकम यांचा विजय

Kolhapur Mayor Ruparani Nikam: कोल्हापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची घोषणा झाली आहे. महापौर पदावर भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली.

Siddhi Hande

कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता

कोल्हापूर महापालिकेत महापौर पदावर रुपाराणी निकम यांची निवड

उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग विजयी

रणजित माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका होऊन २० दिवस झाले आहेत. त्यानंतर आता महापौर पदाची निवड करण्यात येत आहे. अनेक महापालिकांचे महापौर निवडण्यात आले आहेत. आज कोल्हापूर महापालिकेच्या महापौराची निवड करण्यात आली आहे.

कोल्हापूर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट विजय मिळवला आहे. महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे. उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग विजयी झाले आहेत.कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीच्या हातात गेली आहे.

महापौर पदासाठी झालेल्या मतदानात महायुतीच्या उमेदवार रुपाराणी निकम यांना ४६ मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांना ३५ मते मिळाली. महापौर निवडणुकीत बहुमत मिळवत रुपाराणी निकम या कोल्हापूरच्या भाजपच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीकडून जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अक्षय जरग आणि काँग्रेसकडून दुर्वास कदम यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत अक्षय जरग यांना ४६ मते तर दुर्वास कदम यांना ३५ मते मिळाली. त्यामुळे अक्षय जरग यांची कोल्हापूरच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे.

महापौर आणि उपमहापौर निवडीचा निकाल जाहीर होताच भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महापालिका इमारतीबाहेर फटाके फोडून आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. महायुतीने महा पालिकेतील सत्ता अधिक मजबूत केल्याने येत्या काळात शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT