Kolhapur Accident: नववर्षांच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला, कोल्हापुरात भरधाव कारने तिघांना चिरडलं; जागेवरच मृत्यू

Kolhapur Car Accident: कोल्हापूरमध्ये भीषण कार अपघात झाला. रस्त्याच्या कडेला शेकोटी करत बसलेल्या तिघांना भरधाव कारने चिरडले. या अपघातामध्ये तिघांनी जागीच प्राण सोडले. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
Kolhapur Accident: नववर्षांच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला, कोल्हापुरात भरधाव कारने तिघांना चिरडलं; जागेवरच मृत्यू
Kolhapur AccidentSaam Tv
Published On

Summary:

  • कोल्हापुरमध्ये भयंकर कार अपघात झाला

  • भरधाव कारने तिघांना चिरडले

  • अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला

  • रस्त्याच्या कडेला शेकोटी करत बसले असता काळाचा घाला

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापुरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव कारने तिघांना चिरडले. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात हा भयंकर अपघात झाला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास तिघेजण तावडे हॉटेल चौकात शेकोटी करून रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते. त्याच वेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने या तिघांना चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Kolhapur Accident: नववर्षांच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला, कोल्हापुरात भरधाव कारने तिघांना चिरडलं; जागेवरच मृत्यू
BEST Bus Accident : भावाचं लग्न आटोपून वर्षा घरी निघाली, पण वाटेतच काळाचा घाला; बेस्ट बसने चिरडल्याने नर्सचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना अपघाताची माहिती दिली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवले. तिघांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Kolhapur Accident: नववर्षांच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला, कोल्हापुरात भरधाव कारने तिघांना चिरडलं; जागेवरच मृत्यू
Accident : नववर्षाच्या पूर्वसंध्येला कार दुचाकीचा अपघात; मद्यधुंद कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवलं, मायलेकाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com