रणजित माजगावकर, प्रतिनिधी...
Kolhapur Wedding News: सध्या सर्वत्र लग्न सराईची धामधुम सुरू आहे. ज्यामधील अनेक किस्से सोशल मीडियावर ऐकायला मिळत असतात. कधी नवरा नवरीच्या एन्ट्रीची तर कधी लग्नातील डान्सची चर्चा होत असते. सध्या कोल्हापूरमधील एका लग्नाची अशीच चर्चा होताना दिसत आहे.
लग्न झाल्यानंतर नवविवाहित दांपत्याने करवीरनिवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिरावर चक्क हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत आशिर्वाद घेतले आहेत. या आगळ्या वेगळ्या देवदर्शनाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथल्या राज माळी यांच्या अभियंता असलेल्या बहिणीचे मंगळवारी गोव्यातील व्यावसायिक शशिकांत गोसावी यांच्याशी विवाह पार पडला. अगदी धुमधडाक्यात लग्न झाल्यानंतर नवविवाहित दांपत्याने लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिरावर चक्क हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत वंदन केले आणि आशीर्वाद घेतले.
गोसावी यांच्या घरातील हा शेवटचा विवाह सोहळा असल्याने तो धूमधडाक्यात साजरा करण्याचे त्यांनी ठरविले होते. यामुळे लग्न लक्षात राहावं आणि जोरात व्हावे यासाठी लग्नाच्या आधी शशिकांत - प्रियांका आणि नवनाथ - संजना या वधूवरांचे हेलिकॉप्टर मधून महालक्ष्मी, जोतीबा देवावर पुष्पवृष्टी करावी असे ठरले. (Latest Marathi News)
त्यानुसार दुपारच्या मुहूर्तावर दोन्ही जोडप्यांचे लग्न पार पडले. तीन वाजता दोन्ही वधू वर हे अमर सूर्यवंशी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आणि अंबाबाई मंदिराकडे रवाना झाले. वातावरण खराब असल्याने त्यांनी पाऊण तासातच प्रथम अंबाबाई मंदिर व नंतर जोतीबा देवावर पुष्पवृष्टी केली. तसेच दोन्ही देवांकडे सहजीवनाचा प्रवास सुखकर व्हावा अशी मनोभावे प्रार्थना केली.
प्रकरण अंगलट येणार....
मात्र या देवदर्शनानंतर हे प्रकरण चांगलेच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण कोल्हापूरातील प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने काही सवाल उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
खराब हवामान असल्यास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या तरीही संबंधिताने अंबाबाई आणि जोतिबा मंदिरावर पुष्पवृष्टी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज आप्पासाहेब माळी यांनी पुष्पवृष्टी करण्याबाबत परवानगी मागितली होती. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर शहरातील काही वस्तीवर बराच वेळ भरकटल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने केला आहे. (Kolhapur Viral News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.