Kolhapur Jotiba Chaitra Yatra, Coconut saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Jotiba Chaitra Yatra : चैत्र यात्रेत जोतिबाला जाणार आहात ? वाचा नवे निर्बंध

आगामी काळात जाेतिबा मंदिरात भाविकांची हाेणारी गर्दी लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रणजित माजगावकर

Kolhapur News : दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात नारळाचे केसर काढण्यास, खोबऱ्यांची वाटी उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी केसर काढून नारळ, खोबऱ्यांचे तुकडे करून विक्री करावी असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे. (Breaking Marathi News)

चैत्र यात्रेत जोतिबा मंदिरात (Jotiba Chaitra Yatra) भाविकांची माेठी गर्दी असते. केसर काढून नारळ फोडताना केसराचा ढीग पडतो. हा ढिग लवकर बाजूला होत नाही. त्यामुळे भाविकांची अडचण होते. तसेच यात्रेत गुलाल- खोबरे मोठ्या प्रमाणात उधळण्यात येते. यामध्ये अखंड खोबऱ्यांची वाटी सुद्धा पालखी, सासनकाठीवर उधळली जाते.

अखंड खोबऱ्यांची वाटीमुळे भाविक जखमी होतात. उंचीवरून व लांबून आलेल्या खोबऱ्यांच्या वाटीचा मार भाविकांना जोरात बसतो. यावर उपाय म्हणून प्रशासनाने जोतिबा मंदिरात नारळाचे केसर काढणे आणि दुकानात खोबऱ्यांची वाटी विक्रीस मनाई केली आहे. व्यापाऱ्यांनी केसर काढून आणि खोबऱ्यांचे तुकडे करून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत.

सहकार्याची अपेक्षा

साम टीव्हीशी बाेलताना तहसीलदार रमेश शेंडगे (tashildar ramesh shendge) म्हणाले नारळाचा कचरा पडतो. नारळपाणी सांडून भाविक घसरून पडतात. हे टाळण्यासाठी नारळ केसर काढून देण्याबाबत आदेश दिला आहे. व्यापारी, दुकानदार आणि भाविकांनी सहकार्य करून यात्रा सुरळीत पार पाडावी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळी नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये चढताना तोल गेला, प्लॅटफॉर्म अन् ट्रेनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

LPG Subsidy New Rule: ... तर बंद होणार गॅस सबसिडी, 7 दिवसांत करा हे काम, फोनवर आलेल्या मेसेजमध्ये नेमकं काय?

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा होणार सुनावणी

Fort In Kolhapur : रणनीती, लढाई अन् समर्पण, कोल्हापूरला गेल्यावर न विसरता पाहा 'हा' ऐतिहासिक किल्ला

SCROLL FOR NEXT