ऐकलतं....समृद्धी हायवेप्रमाणे माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल, असं विधान करणाऱ्या या आहेत... मंत्री पंकजा मुंडे....परळीतील एका कवी संमेलनात राजकारणावर बोलताना पंकजा मुंडेंनी थेट राजकारणातून निवृत्तीवर हे विधान केलं... आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात पंकजा मुंडेंच्या निवृत्तीची जोरदार चर्चा रंगली....मुंडे नेमकं काय म्हणाल्या पुन्हा ऐका....
दरम्यान पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर त्य़ांच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झालीय. आणि त्यामुळेच काँग्रेसनं संधी साधत त्यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिलीय. पंकजा मुंडेंनी भाजपातून बाहेर पडावं आणि राज्याच्या मुख्यमंत्री व्हावं अशी, अशी ऑफर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी दिलीय. तर भाजपनं यावरून वडेट्टीवारांवर निशाणा साधलाय.
पंकजा मुंडेंकडे सध्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण या खात्याचा कारभार आहे... मात्र या खात्यावरून पंकजा मुंडेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केलीय... या खात्याबद्दल कोणालाच माहिती नाही, आमचा आवाज कुणापर्यंतच पोहचत नाही, अशी खंत पंकजा मुंडेंनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवलीय. पशुसंवर्धन आणि पर्यावरण खात्याबद्दल पंकजा मुंडेंच्या नाराजीमुळे विरोधकांनी ओबीसी नेतृत्वाचा मुद्दा पुढे करून मुंडेंना ऑफर दिलीय...मात्र आता या ऑफरवर पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.