Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये शिवलिंग स्थापनेवरून दोन गटात जोरदार राडा

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

कल्याणमध्ये शिवलिंग स्थापनेवरून दोन गटात जोरदार राडा

काही महिलांना बेदम मारहाण

राडादारम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी संतापल्या

महिलांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे

बाईट आशा शर्मा पीडित महिला

अती धाडस अंगलट, दुचाकीसह व्यक्ती गेला वाहून; कोरेगाव येथील मुळा-मुठा नदीवरील पुलावरील घटना

पुलावरून पाणी जात असताना त्यातून दुचाकी घालण्याचे धाडस एका व्यक्तीस चांगलेच महागात पडले. दुचाकीसह ते पाण्यात वाहून गेले. ही घटना कोरेगाव मूळ येथील मुळा मुठा नदीवरील पुलावर सहा वाजण्याच्या सुमारास घडली.त्यांचे शोधकार्य सुरू आहे. गंगाराम साहेबराव गोते ( वय अंदाजे ५५, रा. बिवरी, ता. हवेली ) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुळा मुठा नदीवर कोरेगाव मूळ ते बिवरीला जोडणारा पूल आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने या नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी हे पुलावरून वाहत आहे. या पाण्यातून दुचाकीसह जाण्याचे धाडस गंगाराम गोते यांनी केले. पुलावर काही अंतर आल्यानंतर पाण्याच्या अती प्रवाहामुळे ते दुचाकीसह पाण्यात पडून वाहून गेले..

कोल्हापुरातील श्री संत बाळूमामा देवस्थानात 60 कोटींचा घोटळा

कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून देवस्थान समितीच्या घोटाळ्याचा तपास सुरू आहे. तत्कालीन धर्मादाय निरीक्षक अधिकारी रागिणी खडके, रावसाहेब कोणकेरी यांच्यासह कंत्राटदारावर आहे गुन्हा दाखल.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या युवकाला जीवदान

आज दुपारी चार वाजता एक युवक गरवारे पुलाखाली नदीपात्रात अडकला असल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात प्राप्त होताच तात्काळ एरंडवणा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी एक तरुण मधोमध पाण्याच्या प्रवाहात एका खांबाला धरुन उभा आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी क्षणाचा ही विलंब न करता पाण्यात उतरुन लाईफ जॅकेट, रिंग आणि रश्शी याचा वापर करुन त्याला धीर देत त्याच्यापर्यंत पोहोचले. तो तरुण अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत असताना त्याच्या कमरेला रश्शी बांधून आणि लाईफ जॅकेट घालून जवानांनी त्याला सुखरूप बाहेर घेत आपले कर्तव्य बजावले.

Pandharpur : धावत्या कारवर विजेचा खांब कोसळला; चार जण थोडक्यात बचावले

रस्त्याने भरधाव वेगाने चाललेल्या एका कारवर विजेचा खांब कोसळल्याची धक्कादायक घटना आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून कारमधील चार जण थोडक्यात बचावले. वैभव पाटील आपल्या कारमधून गादेगावकडे जात असताना गावानजीक आले असता विद्युत प्रवाह सुरू असलेले सात ते आठ खांब कोसळले. त्यातील एक खांब त्यांच्या कारवर कोसळल्याची घटना घडली.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

धाराशिव -

धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

भुम तालुक्यातील आंबी,पाथरूड, बेदरवाडी परीसरात मुसळधार पाऊस

पाथरुड ते आंबी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलावर नागरीकांचा धोकादायक प्रवास

तर आंबी येथील आंबीका देवी मंदिराच्या पायऱ्यापर्यंत पाणी

भुम शहरांमधून वाहणाऱ्या बाणगंगा नदी प्रवाहीत,मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह

Beed: बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट, खासदार बजरंग सोनवणे यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

बीड -

बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना पुरवण्यात येणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटबाबत खासदार बजरंग सोनवणे यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र.

बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट, कैद्यांना वापरण्यासाठी मोबाईल व इतर बाबी संदर्भात वारंवार तक्रारी झाल्याचं पत्रात नमूद.

याच बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आहे.

Nagpur: ओबीसीच्या न्याय हक्कासाठी काढण्यात आलेल्या मंडल यात्रेला भंडाऱ्यातून सुरूवात

नागपूर -

- ओबीसीच्या न्याय हक्कासाठी काढण्यात आलेल्या मंडल यात्रेला आज भंडारा जिल्ह्यातून सुरूवात झाली.

- ही यात्रा थोड्याच वेळात नागपुरात जगनाडे चौकात पोहचणार आहे...

- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली आहे..

- ओबीसींची स्वतंत्र जनगणना सह ओबीसी समाजाच्या वेगवेगळया मुद्द्यांना घेऊन ही यात्रा काढण्यात आली...

- नागपूर वरून ही यात्रा वर्ध्याकडे रवाना होणार ...

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी

हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी

जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार कमबॅक केला

हिंगोली शहरासह कळमनुरी वारंगा फाटा परिसर वसमत सेनगाव या भागांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली

दरम्यान मराठवाड्यामध्ये दोन महिने दळवी मारून बसलेल्या पावसाला आता कुठेतरी सुरुवात झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

Kolhapur: कोल्हापूरमध्ये हॉटेल व्यवसायिक आणि प्रशासनामधील बैठकीमध्ये गोंधळ

कोल्हापूर -

कोल्हापूरमध्ये हॉटेल व्यवसायिक आणि प्रशासनामधील बैठकीमध्ये गोंधळ

शहरातील हॉटेलच्या दरवाढीवरील मुद्द्यावरून झाला वाद

वादाला सुरुवात होताच मुख्याधिकाऱ्यांनी बैठकीतून घेतला काढता पाय

चार दिवसापूर्वी कुरुंदवाड मधील एका हॉटेलमध्ये सार्वजनिक शौचालयातील पाणी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आला होता समोर

या गंभीर प्रकरणानंतर आज मुख्याधिकाऱ्यांनी बोलावली होती शहरातील हॉटेल व्यवसायिकांची बैठक

हॉटेलमधील स्वच्छतेनंतर दरवाढी च्या मुद्द्याला सुरुवात होताच झाला गोंधळ

Pune: पुण्यात मुळा मुठा नदीमध्ये ४ कार अडकल्या

पुणे -

पुण्यात मुळा मुठा नदीमध्ये ४ कार अडकल्या

पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानंतर नदीपात्र रस्ता वाहतूकमध्ये अडकल्या गाड्या

खडकवासला धरणातून 29 हजार क्युसेकने पाणी सोडले जातेय

खासदार संजय राऊत यांचा इंदापूरच्या निमगाव केतकीत माळी समाजाकडून जाहीर निषेध

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे माळी समाजाने आक्रमक आंदोलन केले.

उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारून माळी समाज बांधवांनी धिक्काराच्या घोषणा दिल्या.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची धडपड; अंबरनाथ नगरपरिषद अजूनही झोपेत

अंबरनाथ शहरातील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या मुख्य उड्डाणपुलावरील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच पुढाकार घेत खडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत असले, तरी नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरवर्षी याच रस्त्यावर खड्डे का पडतात आणि कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना टोला

जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता नाही आलं, मराठ्यांसह सगळ्या जातींनी मोठं केलं आणि टोळीने ओरबाडून खाल्लं. ना ओबीसी मोठा होऊ दिला, ना मराठा मोठा होऊ दिला, मारामारीत वेळ जास्त घातला.
मनोज जरांगे पाटील

Baravi Dam  : बारवी धरण 91 टक्के भरलं, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण 91 टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची पातळी सतत वाढतीय. धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे बारवी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. धरण परिसरातून होणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता, प्रशासनाने नदीकाठच्या सरकारी यंत्रणांसह गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Accident : नंदुरबार खांडबारा महामार्गावर भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

नंदुरबार खांडबारा रस्त्यावरील भादवड गावालगत दोन मोटारसायकलींची समोरासमोर भीषण धडक झाली.या दुर्दैवी अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर सध्या खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Pune : माजी पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे यांची सुरक्षारक्षकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

गोखले इन्स्टिट्यूटच्या परिसरात भानुप्रताप बर्गे हे गाडी पार्किंग करत होते. त्यावेळी गार्डने विचारणा केल्याने ते संतापले. पार्किंग फुल असल्याचं सांगताच संतापाने त्यांनी गार्डला मारहाण केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर भानुप्रताप बर्गे यांनी गोखले इन्स्टिट्यूट मधील घटनेवर स्पष्टीकरण देत सुरक्षारक्षकच अंगावर आले. मी माजी पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. तरीही तो अंगावर आला त्यामुळे मी त्या सुरक्षारक्षकावर हात उचलला. तर सुरक्षारक्षकाने ही माझी माफी मागितली. त्यासंदर्भात तक्रारही दिली आहे, असं म्हणत भूमिका स्पष्ट केली आहे.

Bankipur bypoll results : प्रशांत किशोर यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

प्रशांत किशोर यांच्या पत्नी डॉ. जान्हवी दास यांनी मतदारांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, प्रशांत किशोर यांनी विजयासाठी खूप मेहनत घेतली आहे. सर्वांचे मनापासून आभार.. दरम्यान, बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी २३ व्या फेरीनंतर मोठी आघाडी घेतली आहे.

By Election Result Live Updates: प्रशांत किशोर यांची विजयाकडे वाटचाल, 12809 मतांनी आघाडीवर

२२ व्या फेरीनंतर प्रशांत किशोर यांनी तब्बल १२८०० मतांनी आघाडी घेतली घेतली आहे. भाजपचे नीरज सिन्हा ३१७१६ मते मिळाली आहे. प्रशांत किशोर ४४५२५ मते मिळाली आहेत.

डोंबिवलीत धोकादायक झाड कोसळलं! दोन वाहनांचं नुकसान, रहिवाशांमध्ये चिंता

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील सुदर्शन नगरमध्ये सोमवारी सकाळी झाड कोसळून दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. ओम अगत्य सोसायटीच्या आवारातील औदुंबराचे झाड अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून झाड बाजूला केले. दरम्यान, एमआयडीसी निवासी परिसरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात या परिसरात सुमारे 15 झाडे कोसळल्याचा दावा रहिवाशांनी केला असून, धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

भाजपमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश

भाजपा प्रदेश अध्यक्ष मा श्री रविंद्र जी चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण पक्षप्रवेश झाला आहे. यामध्ये अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंचांसह अनेक स्थानिक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. पुढील काही दिवसांत राज्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत, त्याआधी भाजपची ताकद वाढली आहे.

Delhi: जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, एनएसयूआयने 'विद्यार्थी न्याय मोर्चा' काढला

दिल्ली -

जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा निषेध

पेलेट गनच्या वापराच्या निषेधार्थ मोर्चा

एनएसयूआयने 'विद्यार्थी न्याय मोर्चा' काढला

Parbhani: परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड

परभणी -

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक

नाट्यमय घडामोडींनंतर अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड

उपाध्यक्ष पदी राजेश पाटील गोरेगावकर यांची निवड

Beed: मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा, 7 ऑगस्टपासून होणार सुरुवात

बीड -

मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा

दौऱ्याला 7 ऑगस्टपासून सुरुवात

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडून दौऱ्याची घोषणा

वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात 

वाशिम जिल्ह्याला आज येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एक दिवसाच्या विश्रांती नंतर मेघगर्जने सह विजेच्या कडकडाटात अनेक भागात कुठे जोरदार पाऊस तर कुठे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसलाय....जोरदार बरसणाऱ्या पावसाने धरण, विहीर, बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे..

कल्याणच्या वाहतूक कोंडीचा फटका नाट्यकलाकरांना

कल्याणच्या अत्रे रगमंदिर मध्ये काल संध्याकाळी चार वाजताचा ऑल दि बेस्ट नाट्यप्रयोग होणार होता मात्र कलाकारांची गाडी वाहतूक कोंडीत अडकल्याने दिड तास उशिराने सुरु करण्यात आली या नाट्य कलाकारांची कलाकारांनी खंत व्यक्त करत रसिक प्रक्षकांची माफी मागितली.

पुण्याच्या भोर तालुक्यातील स्वप्नलोक सोसायटीमध्ये एकाच रात्री 5 घरांमध्ये घरफोडी

बंद घरांच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून, चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 6 लाख 39 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही सर्व कुटुंबे वैयक्तिक कामानिमित्त घराबाहेर गेले असताना रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय.

बीडच्या परळी येथील नवीन भक्तनिवास कामाची धनंजय मुंडेंकडून पाहणी 

१२ ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे स्थान असलेल्या परळी येथील प्रभु वैजनाथ मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. येथे येणाऱ्या भक्तांची उत्तम सोय व्हावी यासाठी प्रशासनाकडून अद्ययावत भक्तनिवासाचे बांधकाम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून, राज्याचे माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी नुकतीच या भक्तनिवासाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.

E20 विरोधात नागपूरात गडकरींच्या घराबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन

E20 विरोधात नागपूरात गडकरींच्या घराबाहेर युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू झाले आहे. मोठ्या संख्येने आंदोलक तेथे उपस्थित आहेत.

पेपर फुटी प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक, निवड प्रक्रियातील ऑनलाइन परीक्षा रद्द करून ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी

राज्यात सातत्याने MPSC पेपर फुटी,MHT - CET परीक्षा घोटाळा शिक्षक पात्रता परीक्षेतील गोंधळ यावरुन संभाजी ब्रिगेडच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.राज्यात मागील अनेक दिवसांपासून पेपर फुटीच्या घटना व घोटाळे उघडकीस येत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असुन विद्यार्थ्याचे हित लक्षात घेवुन निवड प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षा कायम रद्द करून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनमध्ये विकल्या गेलेल्या पिझ्झामध्ये आढळल्या अळ्या 

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनमध्ये विकल्या गेलेल्या पिझ्झामध्ये अळ्या आढळल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे पर्यटकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

एटापल्लीत 60 लाखांचा सागवान जप्त; 15 ते 16 संशयित तस्कर फरार, वन विभागाची धडक कारवाई! 

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात वन विभागाने सागवान तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मोहुर्ली उपवन क्षेत्रात सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचा सागवान लाकडाचा साठा जप्त करण्यात आला असून, 15 ते 16 संशयित तस्कर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

धाराशिव- पिक विमा वाटपात असमतोल, महाविकास आघाडी आक्रमक

धाराशिव जिल्ह्यात पिक विमा वाटपात झालेल्या असमतोलाचा निषेध करत महाविकास आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आसूड आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांना न्याय मिळावा,विमा वाटपातील तफावत दूर करावी आणि पात्र सर्व शेतकऱ्यांना तातडीने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

बीड- संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी

आरोपी महेश केदार यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितला. कोर्टाने पुढील तारीख 5 ऑगस्ट दिली

नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन

- नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसचं आंदोलन

- विकास वेडा झाला, कर पूर्ण घेता मग खड्डे का मोफत देतात? काँग्रेसची फलकबाजी

बदलापूर गावातील 400 वर्षे जुन्या प्राचीन गणपती मंदिराचा होणार कायापालट

बदलापूर गावातील ऐतिहासिक 17 व्या शतकातील, सुमारे 400 वर्षे जुन्या प्राचीन गणपती मंदिर तसेच परिसरातील मारुती मंदिराचा कायापालट होणार आहे. या दोन्ही मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठी आणि सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय.

नाशिक- - राज्यातील शासकीय ठेकेदारांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा

- १८ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाचा इशारा

- राज्यातील शासकीय ठेकेदारांचे २० हजार कोटींहून अधिकची बिल थकीत

- हजारो कोटींची बिल थकीत असल्यानं ठेकेदारांवर उपासमारीची वेळ

- बिल थकीत असल्यानं ठेकेदार कर्जबाजारी, १८ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन छेडणार

अंगावर भिंत कोसळून आठ महिन्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात मुसळधार पाऊस आणि सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक कच्ची तसेच दगडी घरे धोकादायक बनली आहेत.. अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून, आईच्या कुशीत झोपलेल्या आठ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे

कॉक्रोच जनता पार्टीची ५ आणि ६ ऑगस्ट रोजी रणनीती बैठक

कॉक्रोच जनता पार्टीच्या कोअर टीमची ५ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय रणनीती बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचे संस्थापक, प्रवक्ते आणि संघटनात्मक नेतृत्व या युवा चळवळीच्या पुढील वाटचालीवर चर्चा व विचारमंथन करण्यासाठी उपस्थित राहतील.

ठाण्यातील तरूण रायगडाच्या खोपोलीतील धबधब्यावर पाय घसरून दरीत कोसळला

सोशल मिडियावरील रिलसाठी फोटो आणि व्हिडीओ काढण्याच्या नादात ठाण्यातील एका तरुणाचा रायगडच्या खोपोलीतील धबधब्यावर पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक कुशवाह वय वर्ष 23 असे मृत तरुणाचे नाव आहे.

अभिषेक आपल्या तीन मित्रांसोबत रविवारी रायगडच्या खोपोलीतील केपी धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी आला होता. फोटो व्हिडीओ काढत धबधब्यावरून परत निघत असताना त्याचा पाय घसरला आणि तो 40 ते 50 फुट खोल दरीत कोसळला.

पुण्यात COEP कॉलेजच्या विरोधात ABVP चं आंदोलन

COEP कॉलेज फी वाढी विरोधात कॉलेज प्रशासनना विरोधात ABVP करणार निषेध

कॉलेज प्रशासनाकडून पदवी शिक्षणाची फी अचानक वाढवण्यात आली असून नियमाच्या बाहेर जाऊन फी वाढ केल्याचा आरोप करत ABVP चे आंदोलन

रत्नागिरी- रायगडचा पालकमंत्री कोणाला करायचं हे तिन्ही नेते एकत्र बसून लवकर निर्णय घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला वाटतं

नाशिक पालकमंत्री त्यांच्या पक्षाची मागणी करणं त्यांनी योग्य आहे

पण मी आधीच सांगितलं सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे आहेत

मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील

सर्वच पक्षांना सोबत घेऊन समन्वय करून हा निर्णय होत असतो

नागपूर शहर युवक काँग्रेसतर्फे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन

- शिक्षण, विद्यार्थी, बेरोजगारी आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर केंद्र सरकारने मौन सोडावे, अशी प्रमुख मागणी.

- मोर्चाची सुरुवात दुपारी १.०० वाजता महाल येथील चिटणीस पार्क चौकातून होणार.

- आंदोलनासाठी युवक काँग्रेसने प्रचार पोस्टर प्रसिद्ध केले पोस्टरमध्ये, "धर्मेंद्र प्रधान तो झांकी है... नितीनजी अभी बाकी है!" असा उल्लेख करण्यात आला आहे

- "प्रश्न आमचे उत्तर तुमचे" आणि "आश्वासन नाही, हिशेब द्या" अशा घोषणांद्वारे केंद्र सरकारवर टीका.

कणकवलीत अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक तपासणी

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कणकवली शहरातील विविध हॉटेल व चायनीज सेंटरची अचानक तपासणी करत अन्नाच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची पाहणी केली. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली. ही तपासणी करताना चायनीज पदार्थांमध्ये बंदी असलेले कृत्रिम रंग वापरले जातात का, तयार करण्यात येणारे अन्न ताजे आहे का, याची सखोल खातरजमा केली.

फुरसुंगीतील नव्या कचरा प्रकल्पांविरोधातील आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू

फुरसुंगी कचरा डेपोमध्ये पुणे महापालिकेकडून प्रस्तावित ५०० मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि विंड्रो वेस्ट प्रक्रिया प्रकल्पाला फुरसुंगी व उरुळी देवाची परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पांविरोधात कचरा डेपोजवळ सुरू करण्यात आलेले ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू राहिले.

लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू, 24 तासात 102 मिलिमीटर पावसाची नोंद....

लोणावळ्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या कुशीत आणि निसर्ग सौंदर्याने बहरले असल्याने मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस लोणावळा शहरात पडतोय.त्यामुळे डोंगरकड्यांवरून कोसळणारे पांढरे शुभ्र फेसाळ धबधबे नैसर्गिक सौंदर्य याची पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहेत. त्यामुळे आपसूकच पर्यटकांची पावले पर्यटन नगरीत दाखल होतात. गेल्या २४ तासांत १०२ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाचा एकूण पाऊस ४२३१ मिमीवर पोहोचला आहे.

माळशेज घाट बंद; स्थानिक पर्यायी मार्गावरील खड्ड्यांनी पर्यटक हैराण

माळशेज घाट मार्ग बंद असल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिक खिरेश्वर–पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरलगतच्या पर्यायी रस्त्याचा वापर करत आहेत. मात्र या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक ठरत असून पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरकारने कर्जमाफी करताच, शेतकरी पुत्राने घातली पायात चप्पल

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नसल्याचा शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी केला होता पण

गतवर्षीच्या विजयादशमीपासून फिरत होते,दुधगावकर अनवाणी पायांनी

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याने धाराशिवच्या दहिफळ येथील सन्मान कार्यक्रमात दुधगावकरांनी आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हातून घातली अनवाणी पायात पादत्राणे

डोंबिवलीत मास्कधारी चोरट्यांची दहशत! CCTV पाहताच कॅमेरा फिरवला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात काळे कपडे, डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातलेल्या चोरट्यांनी घरफोडी करत दहशत निर्माण केली.

शंकरा नगर येथील समर्थ कृपा इमारतीत तीन ते चार जणांच्या चोराच्या टोळीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली.

चोरट्यांची संपूर्ण हालचाल इमारतीतील इमारतीतील CCTV कॅमेरा पाहताच चोरट्यांनी तो दुसऱ्या दिशेला फिरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधी त्यांचे चेहरे आणि हालचाली कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्या.

मेडिकल दुकानाचे शटर उचकटून ४६ हजारांचा ऐवज लंपास

उरुळी देवाची परिसरातील मेडिकल दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने मोबाइल आणि रोख रकमेसह एकूण ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माळशेज घाट मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद; करंजाळे येथे रस्ता खचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील करंजाळे येथे २५ जुलै रोजी रस्ता खचल्याने गेल्या नऊ दिवसांपासून घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार असून सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

दोडामार्गच्या युवकाचा कोल्हापूर चंदगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू

दोडामार्ग तालुक्यातील सोनावल येथील युवकाचा चंदगड (कोल्हापूर) येथे भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम डेगवेकर असे मृत युवकाचे नाव आहे. शुभम डेगवेकर हा दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी पोल्ट्री वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर आदळली. धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

पश्चिम विदर्भाला अतिवृष्टी पुर परिस्थितीचा फटका..सहा जणांचा मृत्यू

पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या पाचही जिल्ह्यांत मागील 2दिवसांत तब्बल ४५ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात पाच जण पुरात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे तर भिंत अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे. याशिवाय १२० वर लहान-मोठ्या गुरांचा मृत्यू पुरामुळे ओढवला आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अमरावती जिल्ह्यात ७२ हजार हेक्टर वर सोयाबीन ,तूर ,कपाशी, संत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...

सह्याद्रीच्या कुशीत कष्ट, संस्कृती आणि निसर्गाचा अनोखा संगम; भात आवणीत रंगले आदिवासी बांधव

माळशेज घाट परिसरात आदिवासी बांधव पारंपरिक गाणी गात भात आवणीच्या कामात मग्न असल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळतेय सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, मुसळधार पाऊस, चिखलाने भरलेली शेती आणि त्यात पारंपरिक गाण्यांच्या तालावर सुरू असलेली भात आवणी…यातून आदिवासी शेतक-यांचे कष्ट, संस्कृती आणि सोबत निसर्गाचा अनोखा संगम साकारला आहे.

अमरावतीच्या बापट चौकात युवकाची हत्या... अवघ्या दोन तासात आरोपी अटक.

अमरावती शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत बापट चौकात शरीफ बेग राशीद बेग या २५ वर्षीय तरुणाची मध्यरात्री हत्या करण्यात आली.. गुंडे शाखने या प्रकरणी दोन आरोपींना अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले, हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झाल नाही. पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला असता मोठी गर्दी यावेळी होती तर दुसरीकडे अमरावतीमध्ये सातत्याने हत्येच्या घटनेमध्ये वाढ होत आहे

बीड ब्रेक: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी.

बीडचे विशेष मकोका न्यायालयात आज होणार विशेष सुनावणी.

संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या साक्षी पुराव्याच्या स्टेज वरती असून या प्रकरणांमध्ये आता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतरही कागदांची जंत्री करण्यात येणार आहे.

आरोपी पक्षाकडून देण्यात आलेल्या अर्जांवर ही न्यायालयात युक्तिवाद होण्याची शक्यता.

डिजिटल इव्हिडन्स ऑडिओ व्हिडिओ यावरही न्यायालयात दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद होणार.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी.

प्रत्यक्षात साक्षी पुराव्याच्या प्रकरणाला सुरुवात न्यायालयात दोन्ही बाजूचे वकील हजर राहणार असल्याची माहिती.

ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेसाठी आजपासून मंडल यात्रा..भंडाऱ्यातून होणार प्रारंभ

इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि प्रामुख्याने जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चा'च्या वतीने आजपासून राज्यभरात मंडल यात्रा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा शुभारंभ आज भंडारा येथून होणार असून पहिल्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.भंडारा येथून सुरू होणारी ही मंडल यात्रा पहिल्या दिवशी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतून प्रवास करेल:ओबीसी, व्हीजेएनटी (VJNT) आणि एसबीसी (SBC) बांधव, भगिनी, युवक व विद्यार्थ्यांनी आपल्या हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी या मंडल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आले आहे.ओबीसींची जातिनिहाय जनगणना लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि समाजाला त्यांचे योग्य हक्क मिळावेत, हा या मंडल यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

सततच्या पावसाने टोमॅटो पिकाला फटका; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकावर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण भरलं

गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने, भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100 टक्के भरले

धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात सुरुवात झालीय

सध्या या 45 स्वयंचलित दरवाजांमधून 3 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू

पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येणार..विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा

Maharashtra News Live Update: माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद; पर्यटकांचे हाल, स्थानिकांचा संताप

कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद असतानाही पर्यटकांची गर्दी कायम आहे. पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी, प्रशासनाचे नियोजन आणि पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

यवतमाळ जिल्ह्यात यंदा साडेपाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली.अशात कपाशीवर मावा, तुडतुडा आणि पांढरीमाशीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.आधीच अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिक आणि शेतजमीन खरडून गेली.त्यातच आता कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय.

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल

पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक व्यक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

भाजपचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिली संजय राऊत यांच्या विरोधात फिर्याद

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वक्तव्य करताना संजय राऊत यांनी शिवी दिली होती

त्याविरोधात नगरसेवक मनीष केत यांनी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय

त्यांच्या फिर्यादीवरून संजय राऊत यांच्या विरोधात BNS कलम 356(2), 352 नुसार गुन्हा नोंद

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तीन धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा

पुण्यातील चार धरणे मिळून एकूण ९९ टक्के पाणीसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्यातील सगळे धरणे मिळून ११ टक्के पाणीसाठा जास्त

खडकवासला, पानशेत, वरसगाव १०० टक्के तर टेमघर ९५ टक्के भरलं

धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली

खडकवासला: १०० टक्के

पानशेत: १०० टक्के

वरसगाव: १०० टक्के

टेमघर: ९५.४५ टक्के

एकूण पाणीसाठा: ९९.४३ टक्के

मागील वर्षी पाणीसाठा (आजच्या तारखेला): ८८.३८ टक्के

पुणे सोलापूर महामार्गावर खड्डे, वाहनचालकांना मोठा मनस्ताप

मोठमोठ्या व्यासाचे व फूटभर खोलीचे खड्डे आणि उखडलेल्या खडीमुळे पुणे-सोलापूर महामार्गाची चाळण

पुण्यातील हडपसर रविदर्शन ते कवडीपाट टोल नाका या अंतरावर खड्डेच खड्डे

पावसात खड्ड्यांमधून उडणाऱ्या पाण्याने तर पाऊस उघडल्यावर उडणाऱ्या धुळीने प्रवाशांसह स्थानिक नागरिकही हैराण

या मार्गावर वारंवार अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात संताप

फटाका सायलेन्सर लावून धिंगाणा घालणाऱ्या बुलेट राजांची "परेड"! दुचाकी जप्त, गॅरेज सुद्धा केली सील

पुणे शहरातील काळेपडळ भागात अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी मध्यरात्री बुलेट आणि इतर दुचाकींच्या मॉडिफाईड सायलेंसरमधून फटाक्यासारखा मोठा आवाज करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांविरोधात काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. या प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल ११ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.

पुणे - लिफ्ट मध्ये अडकलेल्या ५ जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

कात्रज भागात असलेल्या ऋतुगंधा सोसायटी मधील लिफ्ट मध्ये काही लोकं अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला रविवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. दलाच्या जवानांनी तातडीदने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लिफ्टमध्ये चार प्रौढ व्यक्ती व अडीच वर्षांचे एक लहान मूल अडकले होते. दलाच्या जवानांनी हायड्रोलिक स्प्रेडर व कटावणीच्या सहाय्याने लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com