Kolhapur Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: कोल्हापूरमध्ये चाललंय काय? हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना मारहाणीचे सत्र सुरूच, आणखी एक धक्कादायक VIDEO समोर

Kolhapur Viral Video: कोल्हापूरमध्ये हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाणीचे सत्र सुरूच आहे. तुंबळ हाणामारीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Priya More

Summary -

  • कोल्हापूर जिल्ह्यात वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मारहाणीचे सत्र सुरूच व्हिडिओ सतत व्हायरल होत आहेत.

  • सिनिअर विद्यार्थ्यांकडून जुनिअर विद्यार्थ्यांना लाथाबुक्या आणि दांडक्यांनी मारहाण

  • पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन तपास सुरू केला

  • शिवसेनेने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली

कोल्हापूर जिल्ह्यात वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओचे सत्र सुरूच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे इथल्या श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेच्या शामराव पाटील निवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली होती. तळसंदेनंतर पेटवडगाव परिसरातील एका शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याचा शिक्षण संस्थेकडून देखील शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ जुना किंवा नवा यापेक्षा वस्तीगृहांमध्ये विद्यार्थी सुरक्षित आहेत का? असा संपत्त सवाल पालकांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथे हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे दोन व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाले होते. हॉस्टेलमधील काही सिनिअर विद्यार्थ्यांनी जुनिअर विद्यार्थ्यांना लाथाबुक्या, बेल्ट, दांडके याच्या सहाय्याने बेदम मारहाण करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर संताप व्यक्त केला जात आहे.

या मारहाणीमध्ये सिद्धीविनायक सनी मोहिते हा विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणाची नोंद सीपीआर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना ताजी असतानाच आज पेटवडगाव परिसरातील एका हॉस्टेलमधील विद्यार्थ्याला काही विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली. त्यामुळे कोल्हापूरमधील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील वसतीगृहात विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन उबाटा - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांनी या संस्थेत जाऊन संस्था चालकांना जाब विचारला. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या मुलांना ताबडतोब बालसुधार गृहात पाठवावं अशी मागणी देखील त्यांनी केली. शिक्षणसंस्था चालकांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिलं नाही, तर शिवसेना स्टाईलने त्यांना प्रतिउत्तर दिलं जाईल असा इशाराही शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी या शिक्षण संस्थेला दिलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT