Owaisi Kolhapur Visit: ओवैसींचा कोल्हापूर दौरा वादात,हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध का?

Kolhapur On Edge: कोल्हापुरात ओवैसींच्या दौऱ्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.. मात्र हिंदुत्ववादी संघटना ओवैसींना विरोध का करत आहेत? पुरोगामी कोल्हापुरमध्ये धार्मिक धृवीकरणाचा घाट घातला जातोय का? कोल्हापुरला अस्थिर करण्यामागे कुणाचा डाव आहे?
Owaisi visit Kolhapur controversy
Owaisi visit Kolhapur controversySaam Tv
Published On

ही दृश्य आहेत राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरातील.... एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आहेत..त्याला हिंदूत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केलाय.त्यानंतर एमआयएमचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि दोन्ही गट आमने-सामने आले... त्यामुळे कोल्हापूरात तणाव निर्माण झाला होता... तर हा देश आमचाच असल्याने आम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य असल्याचं सांगत इम्तियाज जलील यांनी जोरदार पलटवार केलाय....

खरंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमने राज्यात जोरदार मोर्चेबांधणी केलीय..पुरोगामी कोल्हापूरात आता ओवैसींना विरोध होतोय.. मात्र हा विरोध ओवैसींना आहे की यामागे धार्मिक धृवीकरणाचा घाट आहे? असा सवाल विचारला जातोय..

खरंतर कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे.... मात्र गेल्या काही वर्षात कोल्हापूरात धार्मिक धृवीकरणाला वेग आलाय.. त्यामुळेच पुरोगामी विचाराच्या कोल्हापुर दंगलीत होरपळतंय...मात्र आतापर्यंत किती वेळा कोल्हापूरात दंगली घडल्या?

7 जून 2023

औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटोवरुन कोल्हापूरात दंगल

14 जून 2024

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली दुकानांची जाळपोळ

23 ऑगस्ट 2025

ध्वनी क्षेपकाच्या मुद्द्यावरुन कोल्हापूरात दंगल, वाहनांची जाळपोळ

मात्र हे असं असलं तरी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्याला धार्मिक धृवीकरणाचा विचार कट्टर विचार परवडणारा नाही... त्यामुळे कोल्हापूरकरांनीच सजग राहून कोल्हापूरच्या शांततेसाठी पुढाकार घ्यायला हवा..शाहूमहाराजाचं कोल्हापूर ही आपली ओळख कायम ठेवायला हवी....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com