Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुती की मविआ, कुणाची जादू चालणार?

kolhapur corporation election 2025: कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी पडघम वाजू लागले आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतंय ते पाहणं महत्वाचं ठरेल.
Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुती की मविआ, कुणाची जादू चालणार?
kolhapur corporation election 2025Saam Tv
Published On

Summary -

  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे.

  • २०१५ मध्ये काँग्रेसने सर्वाधिक ३१ जागा जिंकल्या होत्या.

  • यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.

  • भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती आघाडीला सत्ता मिळण्याची शक्यता आहे, पण काँग्रेसलाही सर्वाधिक जागा मिळतील असं चित्र आहे.

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्यातील महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. तर इतर महापालिकाप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेवर देखील सध्या आयुक्त हे प्रशासक आहेत. मागील काळात राज्य सरकारने निवडणुका न घेतल्यामुळे यंदा होणाऱ्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. मागील निवडणूक २०१५ साली झाली. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी यासह इतर स्थानिक असे सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असे प्रमुख पक्ष स्वतंत्र पक्ष होते.

तर आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली होती. २०१५ साली झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये तेव्हा काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे ३१ जागा जिंकल्या होत्या. कोल्हापूर शहरातील स्थानिक ताराराणी आघाडी आणि भाजपने ३१ जागा जिंकल्या तर शिवसेनेला केवळ ४ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीने तब्बल १४ जागांवर आपली घोडदौड सुरू ठेवली होती.

Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुती की मविआ, कुणाची जादू चालणार?
Election Commission : आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; IAS, IPS सहित ४७० अधिकाऱ्यांची नियुक्ती

येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतील निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोल्हापूर महापालिकेवर महाविकास आघाडी निश्चित होणार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र येणार हे नक्की आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढतील असे सध्याचे चित्र आहे. महाविकास विरुद्ध महायुती अशीच लढत यावेळी कोल्हापुरात होणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांची ताकद कोल्हापूर जिल्हासह शहरात देखील अतिशय चांगली आहे. याउलट महाविकास आघाडी फक्त काँग्रेसची ताकद आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद अतिशय नगण्य असल्याचं पाहायला मिळत आहे.

Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुती की मविआ, कुणाची जादू चालणार?
Election : महानगरपालिका निवडणुकासंदर्भात मोठी अपडेट, 'स्थानिक'नंतर मनपा निवडणुकीचा बार उडणार?

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशीच होणार आहे. यामध्ये भाजप आणि शिंदे सेनेला अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये सध्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निवडणुकी वेळी या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार हे नक्की आहे. यातील काही ताकदीचे उमेदवार महाविकास आघाडीकडे जातील ज्याचा फायदा काँग्रेसला होण्याची चिन्हे आहेत.

Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुती की मविआ, कुणाची जादू चालणार?
BMC Elections : मुंबईसाठी एकनाथ शिंदेंचा ठाणे पॅटर्न, BMC जिंकण्यासाठी शिवसेनेनं काय आखला प्लान? | VIDEO

सध्या शहराच्या विविध भागात काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार दिसतात. त्याचा फायदाही होणार आहे. कोल्हापूर शहरातील एकूण चित्र आणि वारे पाहता महायुतीलाच सर्वाधिक जागा मिळणार आणि सत्ता येणार असे दिसते. पण यामध्ये सर्वात जास्त जागा या वैयक्तिक काँग्रेस पक्षाला मिळतील असे दिसते. यंदाच्या महापालिका निवडणुकीत महायुतीतील तीन पक्ष एकत्र आल्यास त्यांची संख्या निश्चितपणे काँग्रेसपेक्षा अधिक होणार आहे.

Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुती की मविआ, कुणाची जादू चालणार?
Amravati Election : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीला सुरुवात, २०२० मधील 'व्होट चोरी'चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com