मुंबई महानगर पालिका निवडणुकींसाठी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदें यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. ठाण्यात यशस्वी ठरलेला 'ठाणे पॅटर्न' आता मुंबईत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत विविध समाज, जात किंवा व्यवसायनिहाय असे तब्बल २५ ते ३० सेल शिवसेनेत स्थापन करून मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवणे, नागरिकांशी संपर्क वाढवणे आणि संघटनात्मक बळकटी यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ठाण्यात या रणनितीमुळे शिवसेनेला चांगले यश मिळाले होते. त्यामुळेच मुंबईतील निवडणुकीतही त्याच पद्धतीने विजय मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून ही अनोखी रणनिती आखण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.