Kolhapur Flood Update Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Flood Update: कोल्हापूरवर पुन्हा पूराचे संकट! राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Kolhapur Rainfall Update: कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कोल्हापूरवर पुन्हा पूराचे संकट आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला होता. हा पूर आता ओसरत असल्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला होता. पण आता कोल्हापूरकरांचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. कारण कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कोल्हापूरवर पुन्हा पूराचे संकट आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोल्हापूरवर पूराचे संकट आहे. पंचगंगा नदी अद्यापही धोका पातळीवर आहे. जिल्ह्यामधील ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण १०० टक्के भरले आहे. राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व ७ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये ११,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तुळशी धरणातून ही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकाचे मोठे नुकसान झाले. पूर ओसरत असल्यामुळे नागरिक निवारा केंद्रावरून परत आपल्या घरी परतले. पण आता पुन्हा पूर येण्याची शक्यता असल्यामुळे ते चिंतेत आले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मात्र पूरस्थिती कायम आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पुरेसा पाण्याचा विसर्ग होत नसल्याने शिरोळ तालुक्यातील शेतीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसत आहे. या तालुक्यातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने इथला शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आम्हाला सरकारी अनुदान नको पण या पुराचा कायमचा बंदोबस्त करा, अशी विनंती इथल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT