कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम असल्यामुळे कोल्हापूर शहर, करवीर आणि शिरोळ तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूरातील पूरस्थितीमुळे अनेक रस्ते पाण्याखील गेल्यामुळे ते बंद करण्यात आले आहेत. अशामध्ये पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
कोल्हापूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणांमधून नद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अशामध्ये जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थितीमुळे ११ राज्य, ३७ प्रमुख जिल्हा मार्ग पूरामुळे बंद झाले होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पण आता अनेक ठिकाणी पूराचे पाणी ओसरले आहे. पण काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. पूराचे पाणी कमी होत असले तरी देखील अनेक रस्ते बंद असल्याने शहर आणि करवीर तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर शिरोळ तालुक्यातील ९ शाळांत निवारा केंद्र सुरू केल्याने या शाळांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. शहर परिसरात घुसलेलं पावसाचं पाणी आता ओसरले आहे. पंचगंगेवरील राजाराम बंधारा पाणी पातळी ४६.०५ फुटांवर आले आहे. तर जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पन्हाळा गडावरील रेडे घाट परिसरातील रस्त्यावर काल दरड कोसळली होती. त्यामुळे पन्हाळ्याहून पावनगडला जाणारा रस्ता बंद झाला होता.
पावनगड हा पन्हाळगडाचा जोड किल्ला आहे. इथे अनेक शिवकालीन वस्तू आहेत. शिवाय लोकवस्ती असून इथल्या नागरिकांसाठी पन्हाळा - कोल्हापूरला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. या परिसरात मुसळधार पावसामुळे रेडे घाट परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली होती. काल सायंकाळी पन्हाळा नगरपरिषद प्रशासनाने रस्त्यावर कोसळलेली दरड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करत रहदारीसाठी रस्ता सुरू करण्यात आला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.