महाराष्ट्र

Kolhapur Flood : 98 बंधारे पाण्याखाली, 147 मार्ग बंद; कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची A टू Z माहिती फक्त 'साम'वर

Kolhapur Flood Update : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी 47.5 फुटांवर पोहोचली आहे. 98 बंधारे पाण्याखाली गेले असून 25 राज्य मार्ग आणि 123 मार्ग बंद बंद झाले आहेत.

Sandeep Gawade

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी 47.5 फुटांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून प्रमुख 25 राज्य मार्ग बंद आणि 123 मार्ग बंद बंद झाले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 98 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणातून प्रति सेकंद 7212 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 147 मार्ग बंद झाले आहेत. पावसामुळे नद्यांचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरलं आहे. कोल्हापूरच्या सकल भागात पाणी साचलं आहे. जिल्ह्यात पूराचीस्थिती पाहता 7006 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच 3237 जनावरांचंही स्थलांतर करण्यात आलं आहे. पावसामुळे नद्यांचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरलं आहे. कोल्हापूरच्या सकल भागात अनेक घरांमध्ये पाणी घुसला असून अनेक नागरिकांना स्थलांतर करण्यात आलेला आहे.

कोल्हापूर शहरानजीक पुणे बेंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणारे हॉटेल्स, मल्टीपर्पज हॉल, गॅरेज गेले पाण्याखाली गेले आहेत.महामार्गा नजीक पुराचं पाणी आलं आहे. सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसंच सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Satara News: जावळी तालुक्यातील डोंगराला मोठ्या भेगा, भूस्खलन होण्याची भिती, गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा पुलाजवळ पाणी आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. चंदगड तालुक्यातील काही गावांना बेटाचं स्वरूप आलं आहे. ८-१० दिवस पुराचं पाणी कमी झालेलं नाही. कोल्हापुरातील महिला आणि रुग्णांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी केडीआरएफ बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO EDLI Scheme: तुमचं PF अकाउंट आहे? तुम्हाला मिळतो ७ लाखांचा मोफत विमा; कसं? वाचा सविस्तर

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, हजर होण्याचे आदेश, नेमकं कारण काय? VIDEO

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

SCROLL FOR NEXT