Kolhapur Crime News Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: लग्न ठरवण्याच्या बहाण्याने लाखोंचे दागिने केले लंपास; वधू-वर सूचक केंद्र चालकाला अटक

नियोजित वधू दाखवण्याच्या बहनाने वधू वर सूचक सेंटर चालकाने संबंधित तरुणाच्या घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, प्रतिनिधी...

Kolhapur News: गेल्या काही दिवसांपासून लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली फसवणूकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर शहरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वधू दाखवण्याच्या बहनाने वधू वर सूचक सेंटर चालकाने संबंधित तरुणाच्या घरी चोरी करून पाच लाख 54 हजार रुपयांचे 12 तोळे दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर (Kolhapur News) शहरातील फुलेवाडी रिंग रोड येथील तरुणाला नियोजित वधू दाखवण्याच्या बहनाने वधू वर सूचक सेंटर चालकाने संबंधित तरुणाच्या घरी चोरी करून पाच लाख 54 हजार रुपयांचे 12 तोळे दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चौकशीतून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

या प्रकरणी पोलिसांनी केंद्र चालक रोहन रवींद्र चव्हाण याला अटक केली असून त्याच्याकडून दागिने आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. फुलेवाडी रिंग रोड येथील अयोध्या कॉलनीतील विपुल चौगुले यांच्या घरी हा प्रकार घडला होता. (Crime News)

चोरट्याने तिजोरीतील १२० ग्रॅम सोन्याचे दागिने व अन्य साहित्य लंबवले होते. दरम्यान या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस करत होते.

यावेळी पोलिसांना वधू वर सूचक सेंटर चालकानेच हा डल्ला टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणी एकाला अटक केली असून 12 तोळे दागिनेही हस्तगत केले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

बजेटआधीच तिजोरीत खडखडाट; फुकट्या योजनांमुळे राज्य अडचणीत, VIDEO

पैठणची गोदावरी झाली सोन्याची खाण;टोपल्या-चाळण्या घेऊन कुटुंब नदीत, VIDEO

Wednesday Horoscope: पैशाचे व्यवहार टाळा; ५ राशींच्या व्यक्तींसाठी प्रियकराकडून मिळेल खास भेट; वाचा राशीभविष्य

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

SCROLL FOR NEXT