Prashant Koratkar  
महाराष्ट्र

Kolhapur News: शिवद्रोही प्रशांत कोरटकरला जामीन; शिवप्रेमींचा संताप

Prashant Koratkar: शिवद्रोही प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र कोणत्या अटी शर्ती ठेवण्यात आल्या आहेत? आणि कोरटकरच्या जामिनावर शिवप्रेमींच्या काय प्रतिक्रीया आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अखेर कोर्टाने दिलासा दिलाय. 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केलाय. कोर्टाने कोणत्या अटी शर्तींवर कोरटकरला जामीन दिलाय? पाहूयात.

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन

50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

तपासासाठी पोलीस बोलवतील त्यावेळी हजर राहावं लागणार

फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही

जामीन मिळाल्यानंतर दोन दिवस मुक्काम न्यायालयीन कोठडीतच

मात्र यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांनी आक्षेप घेतलाय.. तर कोर्टाने घालून दिलेल्या अटी-शर्तींवर बारीक लक्ष ठेवण्याचा इशारा कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी दिलाय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देत कोरटकरने शिवरायांबद्दलही अवमानकारक वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यानंतर कोरटकरने पोलीस संरक्षणात पळ काढला.तब्बल 28 दिवसानंतर कोरटकरच्या तेलंगणातून मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली होती.

मात्र न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान प्रशांत कोरटकरने जामीनासाठी अर्ज केला आणि त्याला जामीन मिळाला. मात्र गुरुवारी कोर्टाला सुटी असल्याने आणखी 2 दिवस कोरटकरचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच राहण्याची शक्यता आहे. शिवद्रोही कोरटकरला जामीन मिळाल्याने कायदा कुचकामी ठरत असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केलीय. त्यामुळे आता महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा कधी करणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT