Belgaum Vengurla Highway ST Truck Accident Bus Driver Death  Saam Tv News
महाराष्ट्र

Accident News : ट्रकची बसला जोरदार धडक, ST एका बाजूने चेपली, वाहनांचा चक्काचूर; कोल्हापूरमध्ये भीषण अपघात

Belgaum-Vengurla Highway Truck ST Bus Accident : बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर भरधाव ट्रकने एसटी बसला अशी धडक दिली की यात दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झालाय आणि एसटी बसचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Prashant Patil

कोल्हापूर : राज्यात अपघातांचं प्रमाण काही करत कमी होत नाहीय. असाच एक भीषण अपघात कोल्हापूरमधील बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर घडला आहे. या अपघातात भरधाव ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिली असून, बसचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चंदगड तालुक्यातील सुपे येथे हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात अनेक प्रवासी देखील जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात ट्रकचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर भरधाव ट्रकने एसटी बसला अशी धडक दिली की यात दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झालाय आणि एसटी बसचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. लक्ष्मण हळदणकर असं मृत एसटी बस चालकाचं नाव आहे.

लग्नावरून परत येताना भीषण अपघात

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात देखील एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली. मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथून विवाह समारंभ आटोपून एका दुचाकीवरून गावाकडे परतत असताना भरधाव आलेल्या कारने दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीसह त्यांच्यासोबत असलेली शेजाऱ्यांची पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना काल सोमवारी मध्यरात्री भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावर घडली. हे तिघेही दुचाकीने चिखला मॉईल इथे जात होते, त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. कैलास मरकाम (वय ४२), पार्वता मरकाम (वय ३६) आणि यामिनी कंगाली (५ वर्ष) अशी मृतकांची नावे आहेत. या प्रकरणाचा गोबरवाही पोलीस अधिक तपास करीत आहे.

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी बोनकट्टा राज्य मार्गावर पाथरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात कारने दुचाकी चालकाला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नवरा-बायको आणि चिमुकलीचा समावेश आहे. तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT