कृष्णा आंधळे माझ्यासोबत आहे; संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या महिलेची एन्ट्री, अज्ञात महिलेचा खळबळजनक दावा

Sarpanch Santosh Deshmukh Killed Case : एका अज्ञात महिलेनं थेट संतोष देशमुखांच्या घरी येऊन खळबळजनक दावा केल्यानं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे.
Santosh Deshmukh killed case New woman entry
Santosh Deshmukh killed case New woman entry Saam Tv News
Published On

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आता जवळपास पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. महाराष्ट्रात या हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नसून, या प्रकरणात पुन्हा एका नवीन महिलेनं एन्ट्री केली आहे. एका अज्ञात महिलेनं थेट संतोष देशमुखांच्या घरी येऊन खळबळजनक दावा केल्यानं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

शनिवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास ही अज्ञात महिला मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या घरासमोरील मंडपात अचानक दाखल झाली. तिने तेथे जमलेल्या लोकांना सांगितलं की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा सध्या तिच्यासोबत राहत आहे आणि आपल्याकडे त्याच्या विरोधात भक्कम पुरावे देखील आहेत. असा खळबळजनक दावा केल्यानंतर तिने त्या ठिकाणीच आपलं बस्तान मांडलं.

Santosh Deshmukh killed case New woman entry
Maharashtra Politics: महायुतीत महायुद्ध? भाजपनं दाखवला २३७ चा आकडा; नंतर शिंदे गटाच्या आमदाराने अतुल सावेंना खडेबोल सुनावले

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, तिने आपले नाव किंवा कोणतीही ओळख उघड करण्यास स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नाही, तर तिने आंघोळ करण्यासाठी देशमुख कुटुंबीयांच्या घरातीलच बाथरूम मिळावं, असा विचित्र हट्ट धरला. तिला दुसरी सोय देऊ केली असतानाही तिनं ऐकलं नाही. अखेर रात्रभर ती घराबाहेरील मंडपातच थांबून राहिली आणि सकाळी केज पोलीस तिला आपल्यासोबत घेऊन गेले. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या गूढ महिलेच्या अचानक झालेल्या आगमनाने आणि तिने फरार आरोपी कृष्णा आंधळेबद्दल केलेल्या दाव्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तिच्या या वागण्यामुळे आधीच दुःखात असलेल्या देशमुख कुटुंबाच्या सुरक्षेची चिंताही वाढली आहे. कुटुंबातील सदस्य धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, केज पोलीस या महिलेची खरी ओळख पटवण्यासाठी, तिच्या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी आणि तिच्या मस्साजोगमध्ये येण्यामागील नेमका हेतू शोधण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत.

Santosh Deshmukh killed case New woman entry
Kalyan Crime : तुम्ही खाताय डर्टी समोसे? समोशांसाठी सडलेले बटाटे अन् खराब तेलाचा वापर; संतापजनक VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com