Kalyan Crime : तुम्ही खाताय डर्टी समोसे? समोशांसाठी सडलेले बटाटे अन् खराब तेलाचा वापर; संतापजनक VIDEO समोर

Kalyan Bad Potatoes Samosa Video Goes Viral : कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरातील हा व्हिडीओ आहे. मोहने गाळेगाव परिसरातील एका घरात सडलेले बटाटे आणि खराब तेलात समोसे बनवले जात असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली होती.
Kalyan Samosa Video Viral
Kalyan Samosa Video ViralSaam Tv News
Published On

ठाणे : खवय्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येकजण आवडीने खात असलेल्या समोशांसाठी सडलेले बटाटे, खराब तेलाचा वापर केला जात असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरातील हा व्हिडीओ आहे. मोहने गाळेगाव परिसरातील एका घरात सडलेले बटाटे आणि खराब तेलात समोसे बनवले जात असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली होती.

मनसे कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी याबाबत व्हिडिओ बनवत समोसा बनवणाऱ्याला जाब विचारत चोप दिला. या प्रकरणी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा समोसा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ तयार करण्यासाठी हलक्या दर्जाचं साहित्य वापरलं जात असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष करत हेच पदार्थ चवीने खाल्ले जात असल्याचं देखील पाहायला मिळतं. कल्याणजवळील मोहने परिसरात एक समोसा विक्रेता सडलेले बटाटे आणि खराब तेल वापरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Kalyan Samosa Video Viral
Beed Crime : बीडमधील 'गावरान ढाबा' मालकाच्या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, डोक्यात वार करुन केला होता खून

गाळेगाव येथील मनसे कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ काढला आहे . यात हा समोसा विक्रेता घरात समोसे बनवून घरोघरी फिरून विकत असल्याचं या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघड करत समोसा विक्रेत्याला देखील जाब विचारत चोप दिला.गलिच्छ वातावरणात घाणेरडे पदार्थ वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या समोसा विक्रेत्यावर या व्हिडीओनंतर तरी कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Kalyan Samosa Video Viral
Maharashtra Cabinet Decision : मोठी बातमी! कॅबिनेट बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय, नितेश राणेंच्या खात्यासाठी मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com