kolhapur aam aadmi party condemns cm arvind kejriwal arrest  saam tv
महाराष्ट्र

Holi 2024 : कोल्हापुरात केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध, 'आप'ने ईडीच्या नावानं मारली बोंब

AAP Holi : मुख्यमंत्र्याला पदावर कार्यरत असताना अटक झाल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे असल्याचे म्हणत कोल्हापुरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले हाेते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (delhi cm arvind kejriwal)  यांच्या अटकेच्या निषेर्धात कोल्हापुर येथे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी ईडीची (enforcement directorate) प्रतिकात्मक होळी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ईडीच्या नावाने बोंब मारून केजरीवाल यांचा अटकेचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून ईडीने अटक केली. त्याचे पडसाद गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात उमटू लागले आहेत. अनेक जिल्ह्यात 'आप'ने अटकेचा निषेध नाेंदविण्यास प्रारंभ केला आहे.

एका मुख्यमंत्र्याला पदावर कार्यरत असताना अटक झाल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे असल्याचे म्हणत केजरीवालांना अटक झाल्याने कोल्हापुरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी कार्यकर्त्यांनी ईडीची प्रतिकात्मक होळी केली. सुडबुद्धीने सुरु असलेल्या कारवाईचा कार्यकर्त्यांनी निषेध नाेंदविला. "ईडी-ईडी लावा काडी" अशा घोषणा देत होळी पेटवण्यात आली. ईडीच्या नावाने शिमगा करत अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी संदीप देसाई (प्रदेश संघटक सचिव) यांच्यासह आपचे कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT