मराठा आरक्षणासाठी भाजपचा मेगा प्लॅन? आमदारांना सूचना, आदेश आणि अलर्ट
Bjp Mega Plan for Maratha Reservation Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: मराठा आरक्षणासाठी भाजपचा मेगा प्लॅन? आमदारांना सूचना, आदेश आणि अलर्ट

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीत भाजपला मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच भोवलाय.. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे भाजपला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात मोठा फटका बसलाय. तर लोकसभेच्या निवडणूकीत भाजपविषयी मराठा समाजात असंतोष असल्याची कबुलीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

लोकसभेत दणका बसल्यानंतर भाजपने मंथन करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजाच्या आमदारांमध्ये विधानसभेच्या दृष्टीने असलेली अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसंच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपनं मेगा प्लॅनची आखणी केलीय.

मराठा आरक्षणासाठी भाजपचा मेगा प्लॅन?

भाजपकडून 48 लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक केली आहे. भाजपच्या झालेल्या पराभवाची कारणं शोधून त्याचा रिपोर्ट तयार केला जाणार आहे. मराठा समाजाचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघात जाऊन लोकांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. 15 दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करण्यात आलीय.

मराठा समाजासाठी केलेली कामं अधिक जोरकसपणे मांडण्याच्या आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांची माहिती तळागाळात पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुणीही गाफील राहू नका, विरोधकांना कमी समजू नका, असे आदेश भाजपच्या वरिष्ठांनी आमदारांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

लोकसभेच्या दृष्टीने भाजपने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आखलेली रणनिती फेल ठरली. पण आगामी काळातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपने आखलेली रणनिती यशस्वी ठरणार की नाही? यातूनच राज्याच्या सत्तेची किल्ली कुणाकडे जाणार? हे स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT