Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: इंस्टाग्रामवर गर्लफ्रेंडला मॅसेज केल्याने बॉयफ्रेंड संतापला; तरुणाला बाहेर बोलवत केलं भयंकर कृत्य

Boyfriend Killed Young Man Who Texted His Girlfriend: तू माझ्या गर्लफ्रेंडला इंस्टाग्रामवर मॅसेज का पाठवला?; संतप्त होत बॉयफ्रेंडने तरुणाची केली हत्या

Ruchika Jadhav

संजय डाफ

Nagpur News: राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांवरील अन्याय अत्याचार यासह वृद्ध व्यक्ती आणि प्रेम प्रकणातून प्रेमी युगुलांची हत्या अशा घटना सातत्याने पहायला मिळत आहेत. अशात नागपूर येथून अशीच एक काळीज सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या घटनेत प्रेयसीला मॅसेज केल्याने तरुणाची धारधार शस्त्रांनी वार करत हत्या केली आहे. (Latest Nagpur News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गर्लफ्रेंडला इन्स्टाग्रामवर मॅसेज केल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची दिवसाढवळ्या लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने वार करत हत्या झाली आहे. सदर घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. श्रेयांश पाटील असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित आणि श्रेयांश दोघांची एका युवतीसोबत मैत्री होती. घटनेचा सूत्रधार आरोपी अमित याने काही दिवसांपूर्वी श्रेयांशच्या गर्लफ्रेंडला इन्स्टाग्रामवर स्तुती करणारे मॅसेज पाठविले. गर्लफ्रेंडने ही स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली. ते पाहून श्रेयांश संतप्त झाला. त्याने अमितला इन्स्टाग्रामवर मॅसेज करून त्याच्या गर्लफ्रेंडला मॅसेज न करण्याची धमकी दिली.

अमित आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालक श्रेयांशच्या घरी आले. त्यांनी श्रेयांशला चर्चा करण्यासाठी बौद्ध विहाराजवळ येण्यास सांगितले. श्रेयांशनेही धोका ओळखून सोबत चाकू घेऊन गेला होता. बौद्ध विहाराजवळ श्रेयांशची आरोपींसोबत मारहाण झाली. आरोपींजवळ रॉड होते त्यांनी रॉडने हल्ला केल्यानंतर श्रेयांशजवळील चाकू हिसकावून त्याच्यावर वार केला. त्याला गंभीर जखमी करून आरोपी फरार झाले. उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला. काही तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस (Police) निरीक्षक जरीपटका एस कुंभारे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लपलाय 'हा' भव्य-सुंदर पुरातन किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे ट्रिप प्लान करा

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

Akola Fire : अकोल्यात भल्या पहाटे अग्नितांडव, जेजे मॉलला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT