Pune Crime News: पुणे हादरलं! बापच बनला नराधम, पोटच्या मुलीवर केला अत्याचार, आई म्हणाली गप्प राहा

Pune Crime Father Abused Daughter: वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका नराधम बापानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSAAM TV

>> अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune News : पुण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका नराधम बापानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या घटनेने पुणे हादरलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. मात्र आईने त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर १७ वर्षीय पीडित मुलीने स्वतः पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Pune Crime News
Maharashtra Political News: शिवसेनेला केंद्रात मिळणार कॅबिनेट मंत्रिपद? मुख्यमंत्री शिंदे शहांच्या भेटीला दिल्लीला रवाना

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी रात्री १ वाजता तिचे वडील दारू पिऊन घरी आले आणि तिच्या रूममध्ये जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शरारिक संबंध ठेवले. घडलेला हा भयानक प्रकार त्या तरुणीने तिच्या आईला सांगितला. परंतु आईने तिला गप्प बसायला सांगून हा प्रकार कोणालाही सांगायचं नाही असे सांगत धमकी दिली. (Latest Political News)

Pune Crime News
Pune Police In Action Mode: ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली धिंड! पुणे पोलिस अॅक्शन मोडवर

ही घटना पीडित तरुणीने तिच्या मित्राला सांगितली तेव्हा तिच्या आईने तिच्या मित्राला देखील धमकावत शांत राहण्यास सांगितले. अखेर पीडित तरुणीने धाडस करून वानवडी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांसमोर संपूर्ण आपबीती सांगितली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com