Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

मोहन भागवत म्हणाले ७५ मध्ये निवृत्त व्हावे, राऊतांनी पंतप्रधान मोदींना नियम दाखवला, म्हणाले...

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर ७५ वर्षांच्या निवृत्ती नियमाची आठवण करून दिली. भागवतांच्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना जोर आला आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut On PM Modi News : 'पंच्याहत्तरीची शाल जेव्हा अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो', असं सूचक वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून आता वेगवेगळे राजकी अर्थ लावले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोद यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होतील, त्यांनी राजकरणातून निवृत्ती घ्यावी. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर त्यांनी निवृत्ती लादली होती, आता मोदींनीही ७५ वर्षे झाल्यावर निवृत्ती घ्यावी, असे संजय राऊत म्हणाले आहेत. मोहन भागवत हे मोदींना वारंवार निवृत्तीचे संकेत देत असल्याचा बाणही यावेळी राऊतींनी सोडला. दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत, असल्याचा खोचक टोला राऊतांनी लगावला.

या संदर्भात मी रोखठोक लिहिलेला तुम्हाला आठवत असेल. नरेंद्र मोदी जेव्हा संघाच्या मुख्यालयात पहिल्यांदा गेले होते, त्यावेळी सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली, याचा सारांश मी दाखवला होता. ७५ वर्षे झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्याचा नियम नरेंद्र मोदी यांनी स्वत:च केला होता. आपल्या स्वार्थासाठी, आपला मार्ग मोकळा करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षाचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे, त्यांची डोक्यावरची केसही उडाले आहेत. जगभ्रमण करून झाले आहे. सर्व सुख त्यांनी भोगली आहेत, आता ७५ वर्षे झाल्यावर निवृत्त व्हायचं, हा जो नियम आपण केलाय, तसे निवृत्त व्हायला हवं. आरएसएस त्यांना वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूचना देत असल्याचे मला वाटतेय, असे संजय राऊत म्हणाले.

अमित शहाच्या निवृत्तीनंतराच्या कार्यक्रमावर राऊत काय म्हणाले ?

अमित शाह यांनी राजकीय निवृत्तीनंतर काय करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. निवृत्तीनंतर जीवनात अनेक चांगल्या गोष्टी करायला येतात. नानाजी देशमुख होते, त्यांनी संघाचे उत्तम प्रकारचे कार्य केले. अनेकजण आपापल्या भागात सामाजिक आणि इतर कामे, करत असतात. त्याच्यापेक्षा आपल्याला कोण काय करणार त्याविषयी चर्चा करण्याचा कारण नाही. किंबहुना या दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत, हे देशासाठी शुभ संकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri : राजापूरमध्ये मुसळधार पाऊस; अर्जुना धरण ओव्हरफ्लो | VIDEO

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

Spicy Soup Benefits: पावसात तब्येत चांगली ठेवायची? मग 'हे' मसालेदार सूप पिण्याचे फायदे वाचा

Prajakta Koli : १४० करोड भारतीयांना मागे सोडून इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळीने रचला इतिहास

हायवेनंतर जंगल! TMC काँग्रेस नेता अन् भाजप महिला नेता एकाच कारमध्ये; रात्री नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT