

ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत पार्श्वभूमीवर प्रशासनात खांदेपालट
राज्यातील ४ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या
संजय गडदे, साम टीव्ही
ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत प्रशासनात खांदेपालट सुरू आहे. राज्यात सोमवारी ४ बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. काही दिवसांपासून राज्यातील दोन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता तब्बल ४ बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
शासनाने २ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आदेश जारी केलेत.
श्रीधर दुबे - महाराष्ट्र सहकारी विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आता अन्न व औषध प्रशासन, मुंबईचे आयुक्त झाले आहेत.
सत्यजीत बाडे - जिल्हा परिषद, रायगड येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आता अपंगत्व विभाग, पुणेचे आयुक्त झाले आहेत.
डॉ. सुनील भोक्रे - महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक आता शहरी आरोग्य विभाग, मुंबईचे आयुक्त झाले आहेत.
राहुल कुलकर्णी - गृह विभाग, मंत्रालयातील संयुक्त सचिव आता महाराष्ट्र सहकारी विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत.
चार दिवसांपूर्वी २ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ सनदी अधिकारी मनीषा म्हैसकर पाटणकर, मिलिंद म्हैसकर यांच्या बदल्या करण्याचा निर्णय जारी करण्यात आला होता. मनिषा म्हैसकर पाटणकर मंत्रालयात अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभागात बदली करण्यात आली होती. डॉ. आय. एस. चहल, भाप्रसे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होत असलेल्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मनिषा म्हैसकर पाटणकर यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.