Maharashtra Live News Update: अजितदादांच्या विमान अपघातावर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा: अमोल मिटकरी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

अजितदादांच्या विमान अपघातावर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा: अमोल मिटकरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय.

कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीदरम्यान मारहाण प्रकरणी मोठी अपडेट

भाजप उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; करणाऱ्या शिवसेनेचे नेते व उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांना जेल मधूनपुढील चोकशीसाठी घेतले ताब्यात

पोलिसांनी या आधी दोघांना अटक केली असताना दोघांची प्रकृती गंभीर झाल्याने दोघे पोलिस निघरणीत उपचारा साठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात होते दाखल

या दरम्यान न्यायालयात दोघांची ऑनलाइन व्हिसीमार्फत सुनावणी होत दोघांना न्यायालयाने सुनावली होती न्यायालयीन कोठडी

कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाला "अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज"असे नामकरण करण्याचा ठराव नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

अजित दादांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण सहकार क्षेत्रात शोककळा पसरली असून, ही हानी पुणे जिल्ह्यातील दूध संघासाठी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

मालेगावात राजकीय ट्विस्ट भाजपची अचानक माघार 

Summary

ब्रेकिंग

मोठा राजकीय ट्विस्ट – भाजपची अचानक माघार

भाजपच्या दोन्ही नगरसेवकांनी काँग्रेससोबतचा गट रद्द केला

विभागीय आयुक्त कार्यालयातील गट नोंदणी अर्ज रद्द

गट रद्द करण्यासाठी अधिकृत अर्ज दाखल

काँग्रेस–भाजप एकत्र आल्याने जिल्हा व राज्यभरात झाली होती मोठी चर्चा

कट्टर विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते

25 हजाराची लाच घेताना सहाय्यक निबंध कार्यालयातील सहकार अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं

Summary

पतसंस्थेच्या तक्रार सहकार्य करण्यासाठी 25 हजाराची लाच घेताना सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी याला रंगे हात पकडण्यात आले आहे.. बीडचा आंबेजोगाई येथील सहाय्यक निबंध कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.. संतोष भंडारी अस लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे.

Maharashtra Live News Update: परभणीतल्या भाजपच्या बारा सदस्यांमध्ये तिरुमला मोकिंद खिल्लारे यांची गटनेतेपदी निवड 

परभणी शहर महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या भाजपच्या बारा सदस्यांमध्ये तिरुमला मोकिंद खिल्लारे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती.

अजित पवार यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सरोज अहिरे, हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

मुंबई सेंट्रलमधील कैलास अपार्टमेंट्समध्ये आग

सात मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना सायंकाळी ५.४० वाजता अग्निशमन दलाला मिळाली. कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही.

अलिबागच्या आंबेपूर मतदार संघात शिवसेनेचे बॅनर फाडले

जिल्हा परिषद निवडणुकीबाबत गंभिर बातमी आहे रायगडच्या अलिबाग मधून, येथील आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारांचे बॅनर फाडण्याचा प्रकार समोर आला आहे.

हरवलेली आणि अपहरण झालेली मुले; सोशल मीडियावरील अफवांवर मुंबई पोलिसांचा खुलासा

हरवलेली व अपहरण झालेली मुले याबाबत सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर मुंबई पोलिसांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. काही सोशल मीडिया हँडल्सकडून मुलांच्या अपहरणासंदर्भातील आकडेवारी चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, पोलिसांनी अशा अफवांना ठामपणे फेटाळले आहे.

कात्रज दूध संघाला आता अजितदादा पवार नाव 

कात्रज दूध संघाला अजितदादा पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय..

कात्रज दूध संघाने घेतला निर्णय

कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला

अजित दादा पवार दूध संघ असं नाव यापुढे राहणार

washim : वाशिम : तीन वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू 

वाशिमच्या मंगरूळपीर येथे विट भट्टीवर काम करणा-या मजुराच्या तीन वर्षीय मुलीचा खेळता खेळता वीटभट्टी जवळ असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये.

politics : पिंपरी-चिंचवडमध्ये शर्मिला बाबर भाजपाच्या उप महापौरपदाच्या उमेदवार

शर्मिला बाबर भाजपाच्या उप महापौर पदाच्या उमेदवार

शीतल उर्फ विजय शिंदे यांनी उप महापौर पद घेण्यासाठी नाराजी दाखवल्या नंतर

शर्मिला बाबर यांनी भाजप कडून उप महापौर पदासाठी अर्ज केला दाखल

Ajit pawar : अजित पवार यांचे सहा अस्थिकलश अमरावतीमध्ये दाखल

विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्यावर अजित पवार यांचे सहा अस्थिकलश अमरावतीमध्ये दाखल

अस्थी कलशाच्या दर्शनासाठी अमरावती करांनी केली गर्दी

विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन

अमरावती विभागातील अमरावती, वाशिम,बुलढाणा, अकोला, यवतमाळ,वर्धा या सहा जिल्ह्यात अजित पवार यांचे अस्थीकलश घेऊन पदाधिकारी रवाना

अमरावतीकरांचे दर्शन झाल्यानंतर गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाजवळील कुंडात होणाऱ्या अस्थीचे विसर्जन

dombivali : खेळताना मुलीला का बघता?  वडिसांसहित चुलत भावाला बेदम मारहाण

डोंबिवली पश्चिमेतील विजयनगर परिसरात धक्कादायक प्रकार

खेळताना मुलीला का बघता ? असा जाब विचारल्याने मुलीचे

वडिल, काका, चुलत भावाला बेदम मारहाण

मद्यधुंद तरुणांची गुंडगर्दी

मारहाणाची घटना मोबाईल क’मेऱ्यात कैद

मारहाणीत मंगेश पाटील त्यांचा भाऊ महेश पाटील, पुतण्या साई पाटील जखमी

मारहाण करणारे आरोपी तानाजी, आदित्य आणि अन्य जणांच्या विरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

pune : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पुणे पोलिसांकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्ट करत दिली माहिती

दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानीचे नाव असल्याचा दमानिया यांचा दावा

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या चौकशी चे काय, दमानिया यांचा प्रश्न

dhule : धुळ्यात भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना आणि राष्ट्रवादी खेळी

भाजपाचा महापौर बिनविरोध रोखण्यासाठी शिंदे सेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची अनोखी खेळी

भंडाऱ्यात काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्षांचा भाजपात प्रवेश, परिणय फुकेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असलेले काँग्रेसच्या ओबीसी सेलचे भंडारा जिल्हाध्यक्ष शंकर राऊत यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपा नेते माजी राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश भंडाऱ्यात पार पडला. शंकर राऊत माळी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. शंकर राऊत यांच्या भाजपा प्रवेशान काँग्रेसला हा मोठा झटका मानला जातो.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विलनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला होता- जितेंद्र आव्हाड

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विलनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला होता बैठका देखील पार पडल्या होत्या व या बैठकीमध्ये 2000% विलीनीकरण दोन्ही राष्ट्रवादींचं करण्यात येणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे..

मुक्ताईनगरच्या लोहारखेडा-पिंप्रीभोजनाच्या रस्त्यावर अंडरपास करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक

शेतकऱ्यांनी गेल्या एक तासापासून महामार्ग रोखून ठेवला..

महामार्गावर दोन्ही बाजूने एक ते दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा वाहतुकीच्या लागले आहे

मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी शेतकरी करीत आहे

आक्रमक शेतकरी या ठिकाणी झाले आहे

अनधिकृत बांधकामांवर बदलापूर नगरपालिकेची धडक कारवाई

बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतलीय. आज पालिकेमार्फत अंबरनाथ-बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई सुरू राहणार असून शहरातील 400 हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय.

पालघरच्या बिडको परिसरात कंपनीला भीषण आग

ड्युरीयन या फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग . अग्निशमन दलाच्या दोन गाडया घटनास्थळी दाखल . आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीच्या प्रयत्न सुरू . आगीत कोणतेही कामगार अडकले नसल्याची प्राथमिक माहिती . आगीमुळे धुराचे लांबच लांब लोळ . आगीचे चे कारण अस्पष्ट.

माजलगाव मध्ये सर्व सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून अजित पवार यांना शोकसभेतून श्रद्धांजली

विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाले यानंतर संपूर्ण राज्यावरच शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली. राज्यामध्ये सर्वच ठिकाणी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असून त्याच पद्धतीने बीडच्या माजलगाव मध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींनी अजितदादा पवार यांना शोकसभेतून श्रद्धांजली व्यक्त केली असून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे यावेळी सर्वच पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Sushma Andhare : अजित दादांच्या विमानाचा घातपात, आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास करा, सुषमा अंधारे यांची मागणी

आंतरराष्ट्रीय नियमक संस्थेने विमान कंपनीला उड्डाणासाठी बंदी घातली होती मग ते विमान अजित पवारांना न्यायला का आलं? जे पायलट अजित पवार यांना नेण्यासाठी येणार होते पण येता दुसरेच पायलट कसे आले. अपघातानंतर अजित दादा यांच्या घड्याळाचे काय झालं? दृश्यमानता कमी होती तर मग लँडिंग चा आदेश कोणी दिला? असे सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत. तसंच अजित दादांचा अपघात हा घातपात असून आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून याबाबतचा सखोल तपास केला जावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

केडीएमसीत ठाकरे गटाच्या नॉटरिचेबल असलेल्या चार नगरसेवकांपैकी स्वप्नाली केणे घरी परतल्या

केडीएमसीत ठाकरे गटाच्या नॉटरिचेबल असलेल्या चार नगरसेवकांपैकी स्वप्नाली केणे घरी परतल्या

राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्या नंतर झाले होते गायब.

घरी आल्यानंतर मीडिया समोर देखील येणं टाळलं

पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारा, शिंदे सेनेची मागणी

शिवसेना शिंदे सेनेच्या वतीने महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा मारावा यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी हा प्रस्ताव आयुक्तांकडे दिला आहे. अजित पवार यांचे मोठे योगदान पुणे शहरासाठी राहिलेला आहे. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना शहराच्या वतीने आज पक्ष कारला शोक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला. माहिती शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिली.

Jalgaon Mayor: जळगावात आज ठरणार महापौर पदाचा उमेदवार

जळगावमध्ये आज ठरणार भाजपचा महापौर पदाचा उमेदवार

भाजपचा महापौर पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी जळगाव भाजपच्या कोर कमिटीची व नगरसेवकांची बैठक सुरू

बैठकीत नामदार गिरीश महाजन भाजपचे मंत्री शिंदे गट गुलाबराव पाटील आमदार मंगेश चव्हाण आमदार बंद दाराळ चर्चा सुरू

Ratnagiri: रत्नागिरी जिल्हा परिषद हातखंबा गटातून परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी

रत्नागिरी जिल्हा परिषद हातखंबा गटात बंडखोरी करणाऱ्या परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी

जिल्हा परिषद हातखंबा गटातून उमेदवारी नाकारल्याने परशुराम कदम अपक्ष निवडणूक रिंगणात

परशुराम कदम शिंदे शिवसेनेचे युवा सेना कोकण विस्तारक

जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी केली परशुराम कदम यांची हकालपट्टी

शिंदे शिवसेनेकडून हकालपट्टी केल्याचं पत्र जारी

Ratnagiri: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी शिंदे यांचा कोकण दौरा

एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये मिळून होणार तीन सभा

चिपळूण रत्नागिरी आणि कुडाळ येथे शिंदेंच्या होणार सभा

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मोठ्या दिग्गजांच्या होत आहेत सभा

Jalna: दिवंगत अजित पवार यांचे अस्थिकलश दर्शनासाठी जालन्यात

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात ठेवण्यात आला आहे. जालना जिल्हा कार्यालयात आज आणि उद्या अस्थिकलश दर्शनासाठी असणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अजित पवार यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घ्याव अस आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आल आहे..

Solapur Mayor: सोलापूर महापालिकेचा महापौर आज ठरणार

सोलापूर महापालिकेत महापौर पदासाठी आज दाखल केला जाणार उमेदवारी अर्ज

अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या नगरसेवकांची महापालिकेच्या सभागृहात बैठक

सोलापूर महापालिकेत यंदा महापौर निवड बिनविरोध होण्याची शक्यता

भाजपच्या सर्व नगरसेवकांना पक्षातर्फे व्हीप बजावण्यात आलं असून पक्षाच्या आदेशाशिवाय कोणीही महापौर पदासाठी अर्ज दाखल करू नये असे आदेश देण्यात आलेत

त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पद दोन्ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे

1964 साली सोलापूर महापालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत केवळ 3 वेळा बिनविरोध महापौर निवड झाली आहे

यंदा सोलापूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने बिनविरोध महापौर निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जातं आहे

Nagpur Mayor: नागपूर महापालिकेवर महिलाराज, महापौर, उपमहापौर पदाची जबाबदारी स्त्रियांकडे

नागपूर महानगरपालिकेत असणार महिला राज

नागपूरच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती ही तिन्ही महत्त्वाची पदं महिलांकडे असणार

महापौर पदासाठी निता ठाकरे, उपमहापौर पदासाठी लिला हातीबेळे आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, यांच्या नावावर एकमत

आज दुपारी भाजप महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करणार

Malvan: मालवण तारकर्ली येथील एमटीडीसी कार्यालयाला भीषण आग

मालवण तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याच बोललं जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी व एमटीडीसीच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. या आगीत एमटीडीसी कार्यालयातील संगणक, फर्निचर, कागदपत्रे तसेच अन्य कार्यालयीन यंत्रणा जळून खाक झाल्या. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Kolhapur Mayor: कोल्हापूर महापौर पदाच्या उमेदवाराची थोड्याच वेळात होणार घोषणा

कोल्हापूर महापौर पदाच्या उमेदवाराची थोड्याच वेळात होणार घोषणा

भाजप नेते आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील अकरा वाजता करणार कोल्हापूर महानगर पालिका महापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा

कोल्हापूरचा 51 वा महापौर कोण होणार ? याकडे कोल्हापूरचे लक्ष

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीतीसंगमावर पोहचल्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीतीसंगमावर पोहचल्या...

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे घेणार दर्शन

Amravati: अमरावती महापालिकेत आज ठरणार भाजपचा महापौर पदाचा उमेदवार...

अमरावतीत भाजपचा महापौर करण्याच्या हालचालींना वेग

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत काल नागपुरात बैठक संपन्न,

मिलिंद बांबल, ऋषिकेश देशमुख,आशिष अतकरे ही

3 नावे चर्चेत,

कोअर कमिटीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवली..

आज 11 वाजता कोर कमिटीची बैठक...यावेळी भाजप पुरुष महापौर देणार असल्याची सूत्रांची माहिती.

2 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस, 6 फेब्रुवारी रोजी अमरावतीला महापौर मिळणार

मॅजिक फिगर जुडविण्यासाठी राजकीय हालचाली वाढल्या..

Ratnagiri ZP Election: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचाच दणदणीत विजय होईल आणि जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल, असा ठाम विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. वाटद जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. तसेच विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका, विकासासाठी महायुतीलाच विजयी करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं..शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि विश्वासात न घेता कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या शंका दूर करून, त्यांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय येथे एमआयडीसी होणार नाही. असं देखील उदय सामंत यांनी प्रस्तावित वाटद एमआयडीसीबाबत स्पष्ट केलं. विरोधक केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Buldhana: त्रिशरण चौक ते खामगाव रस्ता मृत्यूचा सापळा; राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त...

बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्य प्रवेशद्वारालाच खड्ड्यांचा विळखा पडला आहे. त्रिशरण चौक ते सुंदरखेड आणि पुढे खामगावकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग सध्या अपघातांना खुले निमंत्रण देत आहे. अवजड वाहने आणि एसटी बसची मोठी वर्दळ असतानाही रस्त्याची दुरुस्ती केवळ दिखाव्यापुरती मर्यादित असून, प्रशासनाच्या अनास्थेमुळे दररोज अपघात घडत आहेत. कासवगती काम, धुळीचे प्रदूषण आणि ठेकेदारांवर कोणताही वचक नसल्याने नागरिक संतप्त झाले असून, हा महामार्ग खरंच प्रशासनाच्या नकाशातून वगळला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.....

२५ लाखासाठी उमेदवार विकले गेले- मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे लागले बॅनर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक पक्षप्रवेश होत असून त्यातून राजकीय बॅनरबाजी जोरदार सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कणकवली तालुक्यातील वागदे येथे रात्री बॅनरबाजी करण्यात आली आहे. “२५ लाखासाठी हे उमेदवार विकले गेले” , “आम्ही मात्र स्वाभिमानाने मतदान करणार!” अशा आशयाचे बॅनर उमेदवारांच्या फोटो सहित लावण्यात आले आहेत. सध्या हे बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहातील भोजनात अळ्या आणि किडे आढळले

हिंगोलीच्या कळमनुरी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनात अळ्या आणि किडे आढळल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने हे वसतिगृह कळमनुरी शहरांमध्ये सुरू आहे आणि इथे अनेक विद्यार्थी निवासी राहतात विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व्यवस्था करण्यात येते मात्र याच भोजनामध्ये आज सकाळी जेवण्याच्या ताटामध्ये विद्यार्थ्यांना अळ्या आणि किडे आढळल्याने सामाजिक न्याय विभागाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एकाच दिवशी घेतल्या ५ सभा

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचाराला आता वेग आला असून भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री तथा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीत आज एकाच दिवशी ५ सभा घेतल्या आहेत.हेलिकॉप्टर द्वारे बावणकुळे यांनी जिल्ह्याचे जिंतूर तर गंगाखेड हे दोन टोक गाठले आहेत.त्यांच्यासमवेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर याही उपस्थित होत्या.परभणीच्या जिंतूर तालुक्यातील इटोली,झरी,दैठणा महातपुरी तसेच वडगाव अशा ५ ठिकाणी आज बावनकुळे यांनी सभा घेतल्या आहेत या सभांमधून बावनकुळे यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विकासाच्या मुद्यांवर विजयी करा असे आवाहन त्यांनी केले सोबतच पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचा इशारा पक्षातील काही नेत्यांना दिला आहे पक्षात राहून पक्षाशी विश्वासघात म्हणजे आईशी विश्वासघात आहे त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांच्या ज्यांनी विरोधात काम केलं त्यांना निवडणुकीनंतर घरी पाठवणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केल आहे.

नागपूर महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी ६ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे

आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज स्वीकारले जातील.

- नामांकन प्रक्रिया सिव्हिल लाईन्स येथील महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात होईल.

- भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी काँग्रेसनेही अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

- त्यामुळे महापौर, उपमहापौरपदासाठी मतदान अटळ झाले आहे.

- भाजपच्या महापौर उमेदवाराचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.

- नीता ठाकरे यांचे नाव चर्चेत असून धक्कातंत्राची शक्यताही वर्तवली जात आहे.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार

पुणे महानगरपालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाल्यामुळे पुढील आठ ते दहा दिवस शहराच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

पवना धरणातून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी वाहून नेणारी ७०० मिमी व्यासाची मुख्य पाईपलाईन रावेत परिसराजवळील एका नाल्यात फुटल्याची माहिती

मुलुंडमधील नव्या महापालिका रुग्णालयात सुविधांचा अभाव काँग्रेसचे रुग्णालयासमोर आंदोलन

मुलुंड (पश्चिम) येथील श्रीमती एम. टी. अग्रवाल महानगरपालिका रुग्णालयात मूलभूत सुविधा नसल्याच्या निषेधार्थ आज मुंबई काँग्रेसचे प्रवक्ता व सरचिटणीस राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते या उद्घाटनाला सुमारे ५० दिवस उलटूनही ICU, कुशल कर्मचारी व डॉक्टरांची नियुक्ती न झाल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला आहे व या ठिकाणी भरती करिता लाखो रुपयांची मागणी देखील केली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता राकेश शेट्टी यांनी केला आहे.

मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात

मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवा सेनेचे सचिव विकास गोगावले यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. महाड विधानसभा मतदार संघातल्या नडगाव तर्फे बिरवाडी या जिल्हा परिषद गटातून विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. विकास गोगावले यांची टक्कर राष्ट्रवादीच्या निलेश महाडिक यांच्याशी होणार आहे. महाड मधून बहुतांश उमेदवार हे महायुतीतील घटक पक्षांमधील असल्यामुळे येथे उमेदवारांमध्ये युतीमध्येच काटेकी टक्कर होताना पाहायला मिळेल. मंत्री भरत गोगावले यांची या मतदारसंघावर मोठी ताकद असल्यामुळे विकास गोगावले यांना ही निवडणूक जिंकण्यास फायदेकारक ठरण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे विकास गोगावले मैदानात उतरताच शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश वाढला आहे.

उपराजधानीत नागपूरमध्ये उपमहापौर पदावरून राजकीय वर्तुळात चर्चा.

- भाजपचे महापालिकेत दमदार यश मिळाल्यानंतर निवडणुकीत पदासाठी अंतर्गत नाराजी पुढे येत असल्याच बोलल जात आहेय..

- उपमाहापौर म्हणून अॅड. संजय बालपांडे यांचे नाव भाजप संसदीय समितीने ठरवेल असल्याची चर्चा, त्यानंतर बालपांडे यांनी केली नाराजी व्यक्त....

- मात्र बालपांडे यांचा उपमहापौर पदास नकार कळवला, वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन पद स्वीकारण्यास अनुत्सुकता दर्शवल्याची माहिती.

बारामती मधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारासाठी मार्गस्थ

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती मधून सातारासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. आज सकाळी दहा वाजता त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. काही मिनिटांपूर्वीच सुनेत्रा पवार या बारामती मधील त्यांच्या सहयोग निवासस्थानामधून बाहेर पडल्या आहेत.

अजितदादांचा 100 टक्के घात झाला, आमदार मिटकरींनी व्यक्त केली शंका

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मोठी शंका उपस्थित केलीय.. विमान अपघातावेळी 'तिथं धुकं नव्हतं तर धोका होता ', त्यामुळं अजित दादांचा 100 टक्के घात झाल्याचे ते म्हणालेये.... जोपर्यंत जिवंत आहो, तोपर्यंत लढा देणार, आणि सर्व सत्य जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार, असेही मिटकरी म्हणालेये..

कारण, आज माझं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय.. लवकरच अजितदादानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या निष्ठेपायी त्यांना समर्पित करण्याचा घेणार निर्णय आहो.. यासंदर्भात 'मे' महिन्यात भूमिका जाहीर करणार असल्याचे मिटकरी म्हणालेये..

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराडमध्ये

कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे घेणार दर्शन

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमित्रा पवार कराडमध्ये येणार

त्यानंतर दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अपघाती निधन झालेल्या तरडगाव येथील विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची ही घेणार भेट

सकाळी 10 वाजता सुनेत्रा पवार कराडमध्ये दाखल होतील

परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची बदली,  शालेय शिक्षण विभागाचा निर्णय सीसीटीव्ही नसलेली परीक्षा केंद्रे रडारवर.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत....

यंदा सरसकट सर्वच परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार नाही.त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या परीक्षा केंद्रावरीलच कर्मचाऱ्यांची अदलाबदल केली जाणार आहे. या बाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

पीबीएची निवडणूक आता ६ ऐवजी ४ फेब्रुवारीला होणार..

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे पुणे बार असोसिएशनच्या ( पीबीए) वार्षिक निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे आता सहा फेब्रुवारी ऐवजी 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.त्या दिवशी रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

पीबीएच्या निवडणुकीमध्ये मतदार वकिलांच्या हाताला शाई लावली जाते त्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती साठी मतदान आहे.

या निवडणुकीतही वकिलांना मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दुसऱ्या बोटाला शाही लावण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com