Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर अमित शाह काय करणार? गृहमंत्र्यांनी सांगितला प्लॅन

Amit Shah retirement plan : अमित शाह निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार आहेत. ते वेद-उपनिषद वाचनातही वेळ घालवणार असल्याचं त्यांनी अहमदाबादमधील कार्यक्रमात जाहीर केलं. सहकार क्षेत्राचंही त्यांनी कौतुक केलं.
amit shah News
amit shah Saam tv
Published On

Amit Shah Future Plan: भारतामध्ये राजकीय नेते वृद्धापकाळापर्यंत राजकारणात सक्रिय राहतात. राजकीय निवृत्तीनंतर वेगळ्या क्षेत्रात काम करणारे नेते फार कमी आहेत. पण भाजप नेते आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत एक वेगळा विचार मांडलाय. अमित शाह यांनी राजकीय निवृत्तीनंतर काय करणार, याबाबत स्पष्ट सांगितलेय. ते म्हणाले, "मी ठरवले आहे की, निवृत्ती घेतल्यानंतर मी माझा उर्वरित काळ नैसर्गिक शेतीत घालवणार आहे. नैसर्गिक शेती ही एक प्रकारची वैज्ञानिक पद्धत आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत." विशेष म्हणजे, सध्या अमित शाह नैसर्गिक शेतीच करतात.

आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षानिमित्त गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकार क्षेत्राशी निगडित महिलांसह कार्यकर्त्यांशी बुधवारी अमित शाह यांनी अहमदाबाद येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आपण शेती करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार क्षेत्रातील दृष्टिकोनाचाही उल्लेख केला. अहमदाबाद येथील कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, "निवृत्तीनंतर मी माझा वेळ वेद, उपनिषदांचे वाचन आणि नैसर्गिक शेतीसाठी समर्पित करणार आहे.

amit shah News
Tukdebandi Kayda : आता १ गुंठे जमिनीची खरेदी-विक्री होणार, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

अमित शाह यांनी या कार्यक्रमात आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले की, गुजरातमधील बनासकांठा आणि कच्छ हे पाण्याच्या कमतरतेने ग्रस्त असलेले जिल्हे होते. लोकांना अंघोळीसाठीही आठवड्यातून फक्त एकदाच पाणी मिळायचे. मात्र, आज सहकारी दुग्धव्यवसायामुळे या भागातील कुटुंबे वार्षिक एक कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात. हे फक्त सहकार क्षेत्राच्या यशाचे उत्तम उदाहरण आहे.

amit shah News
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला जाताना अपघात, कार ३०० फूट दरीत कोसळली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com