Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगत दाखविली भीती; सायबर चोरट्यांनी ५७ लाखांचा गंडा

Kharghar News : ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रकार आता सायबर गुन्हेगारांसाठी नवीन राहिलेले नाहीत. मात्र काही वेळेस तोतया पोलीस बनून किंवा सीबीआय, ईडी, पोलिसातून बोलत असल्याचे सांगून कारवाईची भीती मनात घातली जाते

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच सीबीआय मधून बोलत असल्याचे दाखवत गुन्हा दाखल असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखविली. हि कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करत सायबर चोरटयांनी एका जणाला तब्बल ५७ लाख रुपयात गंडा घातला आहे. 

ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रकार आता सायबर गुन्हेगारांसाठी नवीन राहिलेले नाहीत. मात्र काही वेळेस तोतया पोलीस बनून किंवा सीबीआय, ईडी, पोलिसातून बोलत असल्याचे सांगून कारवाईची भीती मनात घातली जाते. कारवाईला घाबरून बाली पडत असतात. अशाच प्रकार खारघर मध्ये समोर आला असून यात सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगत फसवणूक करण्यात आली आहे. 

नवी मुंबईच्या खारघर परिसरामध्ये वास्तव्यास असलेल्या एका इसमाची फसवणूक झाली आहे. यात सायबर चोरट्यांनी संपर्क करत आपण सीबीआय मधून बोलत असून आपल्या नावाच्या पार्सलमध्ये बनावट एटीएम कार्ड, पासपोर्ट आणि अमली पदार्थ सापडले असल्याचा बनाव करण्यात आला. या सोबतच आपल्यावर दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आपल्या बँकेतील रक्कम आरबीआयकडून व्हेरिफाय करुन परत करतो असे सांगितले.  

समोरच्याने पुन्हा फोन करून पैशांची मागणी केली. त्यानुसार सायबर गुन्हेगारांने तब्बल ५७ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. मात्र संबंधिताला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

SCROLL FOR NEXT