satara news saam tv
महाराष्ट्र

Satara : प्रशासनाची बेफिकीरी, नागरिकांच्या कामांचा खाेळंबा, सामाजिक कार्यकर्त्यांची 'तहसील' वर धाव अन् एक घाव दाेन तुकडे

सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे व सहकाऱ्यांनी त्याठिकाणी अखेरीस दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हे कुलूप तोडले.

ओंकार कदम

Satara News : वडूज येथील तहसिलदार कार्यालयातील एका विभागाचा कारभार आज कुलुपाची चावी हरवल्याने दुपारी साडे बारा वाजेपर्यंत थांबला होता. अखेर कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या कामांना वेळ होत असलेल पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनी हे कुलूप तोडले.  (Maharashtra News)

सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस होता. शनिवार व रविवार असे गेली दोन दिवस कार्यालयाला सुट्टी असल्याने तहसिलदार कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (satara)

कार्यालयातील एका खोलीत आवक-जावक, रोजगार हमी, पुनर्वसन अश्या तीन विभागांचे कामकाज चालते. त्यामुळे या विभागाशी कामाशी संबंधित नागरिक येथे सकाळपासून थांबले होते. मात्र या तिन्ही विभागांचे कामकाज चालणाऱ्या खोलीच्या कुलूपाची चावी सापडत नव्हती.

त्यामुळे दुपारी बारा वाजले तरी येथील कामकाज थांबले होते. बहुतांशी नागरिकांची कामे ठप्पच होती. तहसिलदार कार्यालयात कुलूपाविना थांबलेले काम व नागरिकांची झालेली गर्दी पाहून येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे व सहकाऱ्यांनी त्याठिकाणी अखेरीस दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हे कुलूप तोडले. त्यानंतर या विभागाशी संबंधित कामकाजाची सुरूवात करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

White Hair Care: कमी वयातच केस पांढरे होऊ लागले? मग करा 'हा' घरगुती उपाय, महिन्याभरात दिसेल फरक

Maharashtra Politics : ठाकरेंना काँग्रेस नकोय की काँग्रेसलाच स्वबळावर लढायचंय? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

Thursday Horoscope: पैशाचं नियोजन करा अन्यथा...या राशींच्या व्यक्तींना बसणार आर्थिक फटका, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT