Political News : महाजनांच्या हातपाय जोडण्याच्या टीकेवर एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर, सत्तेसाठी कोणाचीही...

मला भाजपावाल्यांचा आग्रह हाेता तरी मी गेलो नाही तर मी अजित पवारांकडे कसं जाणार असे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले.
eknath khadse, girish mahajan
eknath khadse, girish mahajansaam tv
Published On

Jalgaon News : मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. अजित पवारांसोबत मी नाही. मी सत्तेसाठी कोणाचीही हाजी हाजी करणारा माणूस नाही असे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी मंत्री गिरीश महाजनांना टाेला लगावला. मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी खडसे हे भाजपात येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे म्हटलं हाेते. त्यास खडसेंना प्रत्युत्तर दिले. (Maharashtra News)

eknath khadse, girish mahajan
Ganeshotsav 2023 : ताशाचा आवाज तरर झाला गणपती माझा... राज्यभरात गणरायाचे आगमन, बच्चे कंपनीला माेदकांचे आकर्षण

खडसे म्हणाले मी कोणाच्याही मागे फोटो काढणारा माणूस नाही पुढे जाऊन मी संकटमोचन हे असं सांगून पुढे पुढे करणारा माणूस मी नाही. स्वाभिमानाने जगलो स्वाभिमानाने जगेल. सत्तेत जायचं असलं तर कधीच गेलो असतो. गिरीश महाजन सारखं कोणालाही पुढे आणलं नसतं. आम्ही यांना केव्हाच मागे सारलं असते पण माझ्या तत्वात ते नाही.

eknath khadse, girish mahajan
Ganeshotsav काळात बनावट खवा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न फसला, अकरा लाखांचा माल जप्त; भुसावळ पोलीसांची कारवाई

तुम्हांला माहिती कोण कोणाच्या मागे फिरत असतो. फोटोसाठी फिरत असतो. मला अशी गरज नाही. अजित दादांनी जाहीर करावा की मी त्यांच्याकडे आलो आहे, मला भाजपावाले ही आग्रह करतात, बावनकुळे साहेबांनी उघड सांगितले. तरी मी गेलो नाही तर मी अजित पवारांकडे कसं जाणार

काय म्हणाले हाेते गिरीश महाजन ?

खडसेंनी आमची काळजी करू नये, खडसेंनी शरद पवारांना घट्ट धरून राहावं कारण राष्ट्रवादीचे लोक आमच्याकडे यायला लागले आहेत. एकनाथ खडसे अजित पवारांसोबत येण्यासाठी किती हातपाय जोडताय हे आम्हाला माहिती आहे असे वक्तव्य महाजनांनी खडसेंवर केले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com