Kavathe Mahankal News saam tv news
महाराष्ट्र

Sangli News: अन्यथा कवठे महांकाळ बंद करु... क्रीडांगणाचा ताबा घेणाऱ्या तहसीलदारांना खेळाडूंचा इशारा..

Kavathe Mahankal News: सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये खेळाडू विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू झाला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.

Ankush Dhavre

Kavathe Mahankal News:

मैदानांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. खुल्या मैदांनावर बिल्डर्स उंच उंच इमारती बांधत आहेत. त्यामुळे खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानं शिल्लक राहिलेली नाहीत. अशातच मैदानावरुन सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये खेळाडू विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू झाला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.

सांगलीच्या कवठे महांकाळमधील तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर तहसीलदारांकडून मज्जाव करण्यात आला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून तहसील कार्यालयासमोरील क्रीडांगणावर खेळाडूंचा व्हॉलीबॉल सराव सुरू होता.

मात्र कवठे महांकाळ तहसीलदारांकडून क्रीडांगणावरील खेळास बंदी घालण्यात आली आहे.मात्र क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी याचा तीव्र विरोध केला आहे.याच क्रीडांगणावरून राज्य आणि देशपातळीवर चमकणारे खेळाडू निर्माण झाले आहेत. (Latest marathi news)

राज्य सरकारकडून तालुक्यात क्रीडांगण उभारण्याबाबत घोषणा केल्या जात आहेत.मात्र दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून मात्र खेळांवर बंदी आणण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप करत प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा,अन्यथा शहर बंद करून धडक मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी यावेळी दिला आहे.

तर यावेळी कवठे महांकाळ तहसीलदार अर्चना कापसे याना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,या परिसरात अवैध प्रकार घडत आहेत. त्यामुळे याठिकाणचे क्रीडांगण बंद करण्यात आले आहे. मात्र माध्यमांसमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून क्रीडांगण दुसरीकडे हलवण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan : "आपला सूरज लवकरच बाबा होणारे..."; आत्याबाईंचा आनंद गगनात मावेना, जान्हवी किल्लेकरने VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रगती मंदावली! 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Kontoli Bhaji Recipe: पावसाळ्यात कंटोलीची भाजी खावीशी वाटतेय? लगेचच जाणून घ्या रेसिपी

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दरे गावाचा दौरा

Pune Firing: जिम मालकावर अल्पवयीन तरुणांकडून गोळीबार; २ तासांत आरोपी ताब्यात, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT