Prime Volleyball League 2024: लवकरच रंगणार रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीगचा थरार! हृतिक रोशन दिसणार ब्रँडॲम्बेसीडरच्या भूमिकेत

Hrithik Roshan Brand Ambassador Of Prime Volleyball League 2024: लवकरच या स्पर्धेला प्रारंभ होणार असून हृतिक रोशन दिसणार ब्रँडॲम्बेसीडरच्या भूमिकेत दिसणार आहे.
hrithik roshan
hrithik roshansaam tv news
Published On

Prime Volleyball League 2024:

ए २३ यांनी प्रायोजित केलेल्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेसाठी अभिनेता हृतिक रोशन याला ब्रँडॲम्बेसीडर म्हणून करारबद्ध करण्यात आल्यामुळे या स्पर्धेला बॉलिवूडचा तडका मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तंदरुस्ती आणि डायटसाठी प्रसिद्ध असलेल्या हृतिक रोशनने फिटनेसची गरज असलेल्या व्हॉलिबॉलची भागीदार म्हणून निवड केली आहे. इतकेच नव्हे तर स्पर्धेच्या यंदाच्या तिसऱ्या मौसमात सहभागी होणाऱ्या अनेक स्टार खेळाडूशी हृतिकने संवाद साधला.

ए २३ प्रायोजित रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला १५ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणार असून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क वरून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

बेसलाईन व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक आणि सह संस्थापक तुहिन मिश्रा यांनी या स्पर्धेचा राजदूत म्हणून हृतिक रोशनचे स्वागत केले. हृतिक हा आमच्या लीगचा ब्रँडॲम्बेसीडर म्हणून जोडला असल्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे असे सांगून ते म्हणाले की, तंदरुस्ती आणि चपळता याबाबत हृतिकने नवे मानदंड प्रस्थापित केले असून असंख्य खेळाडूंसाठी तो प्रेरणास्थान आहे.

इतकेच नव्हे तर शारीरिक व मानसिक तंदरुस्ती राखण्याबाबत तो सातत्याने प्रचार व प्रसार करीत असतो. त्यामुळेच आमच्या स्पर्धेसाठी त्याच्या सारखा सुपर स्टार लाभणे महत्वाचे होते. त्यामूळे ही स्पर्धा आकर्षक व लक्षवेधी ठरणार आहे. आम्ही या स्पर्धेसाठी अत्यंत उत्सुक आहोत.

hrithik roshan
Rohit Sharma Statement: 'मी आधीच सांगितलं होतं की...', अफगाणिस्तानला धूळ चारताच रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

अभिनेता एचआरएक्सचा संस्थापक हृतिक रोशन यावेळी म्हणाला की, ए २३ प्रायोजित रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेशी जोडला गेल्याबद्दल मला अभिमान वाटत असून या स्पर्धेचा ब्रँडॲम्बेसीडर म्हणून बनणे माझ्यासाठी रोमाचंकारी आहे. स्पर्धेचे संयोजन करणाऱ्या बेस लाईन व्हेंचर्स, सोनी पिक्चर्स नेटवर्क, सोनी लिव्ह आणि स्टुडिओ नेक्ट या सर्वांचे भारतीयांना आकर्षित करणाऱ्या दोन व्हॉलिबॉल लीग स्पर्धांच्या मौसमाबद्दल मी अभिनंदन करतो. या स्पर्धेची वाढती प्रेक्षक संख्या आणि आगामी मौसमात गुणवान खेळाडूंना मिळणारी संधी या सकारात्मक गोष्टींमुळे मी प्रभावी झालो आहे. व्हॉलिबॉलचे भारतातील भवितव्य उज्वल असून या स्पर्धेमुळे नवे गुणवान खेळाडू पुढे येतील. (Latest sports updates)

hrithik roshan
Rohit Sharma Record: एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

ए २३ प्रायोजित रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धा ही बेस लाईन व्हेंचर्स या अग्रगण्य स्पोर्टस मार्केटिंग कंपनीने पुरस्कृत केली असून यंदाच्या तिसऱ्या मौसमात ९ फ्रांचायाझी संघांचा स्पर्धेत सहभाग आहे. या संघांची नावे पुढीलप्रमाणे:- हैद्राबाद ब्लॅक हॉक्स, अहमदाबाद डिफेंडर, कोलकत्ता थंडर बोल्टस, कॅलिकथ हिरोज, कोची ब्लू स्टायकर्स, चेन्नई ब्लिट्स, बेंगळूरु टोरपेडोज, मुंबई मेटीयॉर्स व नवा संघ दिल्ली तुफानस.

hrithik roshan
IND vs AFG: पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचे हे ३ स्टार अफगाणिस्तानवर पडू शकतात भारी

गेल्या वर्षी स्पर्धेच्या दुसऱ्या मौसमाला २०६ दशलक्ष प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या वर्षीच्या १३३ दशलक्ष प्रेक्षकांच्या तुलनेत हा प्रतिसाद खूपच उत्साह वर्धक होता. इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू व मल्याळम या पाचही भाषांमधून सोनी नेटवर्कने एकाच वेळी प्रक्षेपण केले होते. त्यामुळे दुसऱ्या मौसमाला ३७१ दशलक्ष इंप्रेशन, ११३.९ दशलक्ष व्हयुज, ९२ दशलक्ष रीच आणि ५ दशलक्ष पॅन एंगेजमेंट असा प्रतिसाद सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म वरून मिळाल्यामुळे व्हॉलीबॉलची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले.

रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीगच्या तिसऱ्या मौसमाचे संपूर्ण वेळापत्रक व सामन्यांच्या वेळा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com