karyakarta demands shivsena mp sanjay mandlik to contest election independent in kolhapur lok sabha constituency saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Shivsena Candidate : 'जय महाराष्ट्र करा, स्वबळावर लढा'; शिवसेना खासदार संजय मंडलिकांच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला (video)

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Maharashtra Lok Sabha Election :

लाेकसभा निवडणुकीसाठी (lok sabha election 2024) काेल्हापूर मतदारसंघात (kolhapur loksabha constituency) महायुतीकडून (mahayuti) उमेदवारी न मिळाल्यास विद्यमान शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (shivsena mp sanjay mandlik) यांनी स्वबळावर निवडणुक लढवावी असा आग्रह धरु लागले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी मला उमेदवारी देणार असल्याचा शब्द दिल्याने मी निवडणुकीची तयारी केल्याचे खासदार संजय मंडिलक यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या जागे संदर्भात एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. भाजपच्या वतीने समरजीतसिंह घाटगे (samarjeet singh ghatge) यांचं नाव समोर येत आहे. घाटगे हे महायुतीतील घटक आहेत. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना यंदा उमेदवारी मिळणार की नाही ? या संदर्भात उलट-सुटल चर्चा काेल्हापुरात सुरू आहे.

दूसरीकडे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. महायुतीचा मीच उमेदवार असणार आहे असा विश्वास मंडिलक यांनी व्यक्त केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपल्याला उमेदवारी नाकारली तरीही मीच निवडणूक लढवणार, असं विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी नमूद केले. ते म्हणाले आपल्याला तिकीट मिळालं तर ठीक. अन्यथा स्वबळावर अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी असा आग्रही माझे कार्यकर्ते करु लागले आहेत. दरम्यान खासदार संजय मंडलिक यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येत असल्याचे चित्र आहे.

कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा : धनंजय महाडिक

खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यात काही गैर नाही असे खासदार धनंजय महाडिक यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. ते म्हणाले खासदार साहेब संयमी आहेत. येत्या दोन दिवसांत निश्चित सकारात्मक निरोप येईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम राखावा असे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT