beed, rupali chakankar, karuna sharma saam tv
महाराष्ट्र

Beed : करुणा शर्मांनी रुपाली चाकणकरांची केली तक्रार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात...

करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे.

विनोद जिरे

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकर (rupali chakankar) या महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केला आहे. रुपाली चाकणकर (rupali chakankar latest news) यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी देखील शर्मा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच केंद्रीय महिला आयोगाकडे देखील तक्रार दिली आहे.

या पत्रात करुणा शर्मा यांनी म्हटले रुपाली चाकणकर त्यांच कामं निष्पक्षपातिपने करत नाहीत. या शिवाय अनेक गंभीर आरोप असलेल्या नेत्यांसोबतचे फोटो आज ही त्यांच्या फेसबुक वॉलवर दिसून येत आहेत. या शिवाय तक्रारदार महिला आयोगात तक्रार घेऊन आल्यावर तेथून फोटो, व्हिडीओ त्या प्रसारित करतात. यामुळे या महिलांची (women) ओळख समाजापुढे येत आहे असंही त्यांनी म्हंटलं आहे. (Maharashtra News)

पीडिता महिला त्यांच्याकडे न्यायासाठी तक्रार घेऊन येतात, त्यांना न्याय तर भेटत नाही. उलट त्या महिलांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करतात आणि राजकारण करतात. त्यामूळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे आणि केंद्रीय महिला आयोगाला ही तक्रार केली असल्याचे करुणा शर्मा यांनी यावेळी सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे रुपाली चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्ष पदावरून मुक्तता करा, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघरमध्ये शिंदे गटाला जबरदस्त झटका, बडे नेते भाजपच्या वाटेवर; प्रमुख पदाधिकारीही कमळ हाती घेणार

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Pune-Solapur : पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, कारने २ अलिशान गाड्यांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

Acidity in women: ॲसिडीटी, अपचन समजून ५०% लोकं करतायत 'या' गंभीर समस्येकडे दुर्लक्ष; सर्वाधिक महिला आणि मधुमेहींचा समावेश

Jawhar Heavy Rain : अतिवृष्टीने रस्ता खचला; ५० फुटाच्या लांब भेगा, रहदारी पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT