- संजय राठाेड
Yavatmal News : मृतकाच्या नावाने परस्पर पैसे काढण्याच्या प्रकरणात यवतमाळच्या (yavatmal) महागाव पोलीस (police) ठाणे अंतर्गत येणाऱ्या हिवरा संगम येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अकरा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी महागाव पोलिसांना दिले आहेत.
हिवरा संगम येथील जिल्हा मध्यवर्ती बँक (dcc bank) अंतर्गत येणाऱ्या चिखलगव्हाण आणि इतर सोसायट्यांमध्ये अनागोंदी कारभार यापूर्वीच उघडकीस आला होता. कर्जदारांना परस्पर अतिरिक्त कर्जवाटप करणे, कर्ज असताना निरंक असा दाखला देत पुन्हा कर्ज देणे, मृतकांच्या नावे पैसे काढणे, नियम डावलून कर्ज वितरित करणे असे प्रकार येत घडलेत.
त्यामुळे काही महिन्यापूर्वी बँकेतील कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने तसेच संचालक मंडळाने संबंधितांना निलंबित केले. दरम्यान सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महागाव पोलीस स्टेशनला अकरा कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. (Breaking Marathi News)
त्यामुळे आगामी काळात मृतकाच्या नावाने परस्पर पैसे काढण्याच्या प्रकरणात हिवरा संगम येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अकरा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल हाेण्याची शक्यता बळवावली आहे. या प्रकरणाचा पाेलिसांनी छडा लावा अशी अपेक्षा शेतक-यांची आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.