Blank space in place of ‘Marathi’ subject on Karnataka SSLC marksheet triggers controversy in Belagavi. saam tv
महाराष्ट्र

कर्नाटक सरकारला मराठीचं वावडं; दहावीच्या निकालातून 'मराठी' शब्दच गायब

Marathi Word Missing From Karnataka SSLC Marksheet: कर्नाटकच्या दहावीच्या निकालपत्रातून ‘मराठी’ शब्द गायब झाल्याने वाद निर्माण झाला आहे. बेळगावातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप होत असून महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

बेळगाव: सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करण्याची एकही संधी कर्नाटक सरकार सोडत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आता चक्क शिक्षण क्षेत्रातही कर्नाटक सरकारने मराठीविरोधी पाऊल उचलल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालपत्रांमधून (Marksheet) “मराठी” हा शब्दच गायब करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सीमाभागातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर जिथे विषयाचे नाव असणे आवश्यक आहे. तिथे 'मराठी' या शब्दाऐवजी फक्त रिक्त जागा (Blank Space) सोडण्यात आली आहे. विषयाचे नाव न छापता केवळ त्यासमोर गुण नमूद करण्यात आले आहेत. हा तांत्रिक दोष नसून मराठी भाषेचे अस्तित्व पद्धतशीरपणे पुसून टाकण्याचा कर्नाटक सरकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा संताप

या प्रकारावर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले की कर्नाटक सरकारकडून सातत्याने मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत आहे. निकालपत्रातून मराठी शब्द हटवणे हे मराठी माणसाच्या अस्मितेवर घाला घालण्यासारखे आहे. मात्र, कितीही दडपशाही केली तरी सीमाभागातील मराठी भाषा आणि मराठी माणूस कधीही झुकणार नाही. आमची ही चळवळ ध्येय गाठल्याशिवाय थांबणार नाही.

या घटनेमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? 'या' चुका आहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: नागपुरात उद्या शांतता मार्च, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सिजेपी देशभरात रस्त्यावर उतरणार

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! वऱ्हाडाच्या बसची कंटेनरला धडक; १० ते १२ प्रवासी गंभीर, पाहा VIDEO

Ramesh Mhatre : मोठी बातमी! नगरसेवक रमेश म्हात्रेंना कोर्टाचा दणका, शरण येण्याचे आदेश

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

SCROLL FOR NEXT