शाह सरकारला मोठा झटका; सरकार स्थापनेच्या २६ व्या दिवशीच गृहमंत्र्यांचा राजीनामा, नेपाळमध्ये खळबळ

Home Minister Resignation : नेपाळी उद्योगपती दीपक भट्ट यांच्या मालकीच्या कंपनीत गुंतवणूक केल्याचा आरोपानंतर सुदान गुरुंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Home Minister Resignation :
Nepal Home Minister Sudhan Gurung resigns amid controversy, creating political ripples.saam tv
Published On
Summary
  • नेपाळमध्ये गृहमंत्र्यांचा अचानक राजीनामा

  • सरकार स्थापनेच्या २६ दिवसांत मोठा धक्का

  • हितसंबंधांच्या संघर्षामुळे वाद

नेपाळमधील बालेन शाह सरकार जबर धक्का बसला आहे. सरकार स्थापनेच्या २६ व्या दिवसांतच गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी राजीनामा दिला आहे. गुरुंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "हितसंबंधांचा संघर्ष लक्षात घेता, मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशीनंतर मी माझ्या भविष्याबाबत निर्णय घेईन."

Home Minister Resignation :
"पंतप्रधान मोदी दहशतवादी आहेत...", मल्लिकार्जुन खरगे यांचं वादग्रस्त वक्तव्य

सुदान हे बालेन शाह यांच्या नीकटवर्तीय मानले जातात. सप्टेंबर २०२५ मध्ये केपी ओली सरकारविरोधातील आंदोलनांमध्ये गुरंग यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. नेपाळी वृत्तपत्र 'ई-कांतिपूर'नुसार गुरुंग यांचे नाव वादग्रस्त नेपाळी उद्योगपती दीपक भट्ट यांच्याशी जोडले गेले. ज्यामुळे त्यांच्या सहभागाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

Home Minister Resignation :
Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

भट्ट सध्या मनी लाँड्रिंगबाबत चौकशी केली जात आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे नेपाळच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. नेपाळमध्ये बदलाच्या नावाखाली गुरंग यांचा पक्ष सत्तेवर आल्याने, पक्षांतर्गतच त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला. दोन दिवसांच्या अंतर्गत गदारोळानंतर गुरंग यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण कोणतेही पद भूषवणार नाही, असे त्यांनी सांगितले.

गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर गुरुंग यांनी नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. सप्टेंबर २०२५ मधील विद्यार्थी आंदोलन दडपल्याचा आरोप दोघांवर होता. नेपाळच्या राजकीय पटलावर त्यांची अटक महत्त्वपूर्ण मानली गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com