Marathi compulsory: मराठी शिकायचीच नसेल तर निघा; मराठमोळ्या गायकाचा परप्रांतियांना स्पष्ट शब्दात सल्ला

Marathi compulsory: रिक्षाचालकांसाठी मराठी अनिवार्य निर्णयावर दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि गायक उत्कर्ष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Marathi compulsory
Marathi compulsorySaam tv
Published On

Marathi compulsory : मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या वादावर अनेक मराठी कलाकार आपले मत व्यक्त करत आहेत. काल अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने आपले मत मांडत, 'मराठी शिका नाहीतर आपापल्या राज्यात परत जा' अशी ठाम भूमिका मांडली. तर, आता ‘महाराष्ट्राची बिग बॉस फेम गायक उत्कर्ष शिंदे आणि हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी याबाबत आपलं मत मांडलं आहे.

राज्य सरकारने १ मेपासून रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येणं आवश्यक असेल. अन्यथा त्यांचे परवाने रद्द होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. या निर्णयाला काही रिक्षाचालक संघटनांकडून विरोध होत असून ४ मेपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे हा विषय अधिकच तापला आहे.

Marathi compulsory
Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

याच पार्श्वभूमीवर बिग बॉस फेम गायक उत्कर्ष शिंदेने संतप्त प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर लिहीले, मराठी येत नसेल तर शिका-आणि शिकायचीच नसेल तर निघा… परप्रांतीय मित्रांनों तुमचा द्वेष नाही आम्हाला हा आमच्या मराठी भाषे साठीचा ,मान,सन्मान ,अभिमान आहे .. तुम्हाला मराठीच कळत नाही किंवा कळून घ्याचीच नाही म्हंटल्यावर मराठी अस्मिता काय कळणार..ठिक आहे तुम्हाला कळेल त्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न मराठी माणूस नक्की करेन.

Marathi compulsory
Raja Shivaji Cast Fees: रितेश देशमुख ते संजय दत्त; 'राजा शिवाजी' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?
Marathi compulsory
Marathi compulsory Saam tv

तसेच या मुद्द्यावर सचिन गोस्वामी यांनी एक सकारात्मक आणि वेगळा उपाय सुचवला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'रिक्षा चालकांना तीन महिन्याचा व्यवहारउपयोगी मराठी शिकवण्याचा ऑनलाइन क्लास शासनाने तयार करून कंपलसरी करावा.तीन महिन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेवून. पास झालेल्याचा रिक्षा परवाना कायम ठेवून,नापासना उत्तीर्ण होई पर्यंत परवाना निलंबित करावा. हीच पद्धत परभाषिक भाजी विक्रेते,रस्त्यावरील विक्रेते यांच्यात ही राबवता येईल. आपण नागरिकांनी सुद्धा व्यवहारात ठामपणे फक्त मराठीच बोलावे भाषा संवर्धनासाठी हे आवश्यक आहे.. महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे..''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com