Karjat news Saam tv
महाराष्ट्र

Karjat Tragedy : झाडांची पाने तोडणं पडलं महागात; विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू, २ मुले झाली पोरकी

Karjat news : कर्जतमधील तरुणाला झाडांची पाने तोडणे महागात पडलं आहे. झाडावरील विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

कर्जतच्या कळंबोलीत तरुणाचा विद्युत तारेला शॉक लागून मृत्यू

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे गावकरी संतप्त

प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार

ग्रामस्थांकडून निषेध करत चौकशीची मागणी

विकास मिरगणे, साम टीव्ही

कर्जत तालुक्यातील कळंबोली येथील विद्युत महावितरण लाईट सबस्टेशन परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अर्जुन मोरेश्वर मिणमिणे (वय ३९) या व्यक्तीचे नाव आहे. विजेचा प्रवाह लागून अर्जुनचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, झाडांची पाने तोडण्यासाठी गेले असताना झाडाला विद्युत वाहक तार चिकटलेली असल्याने अर्जुनला विजेचा शॉक बसला. त्यानंतर अर्जुनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत अर्जुन मिणमिणे याच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुनच्या मृत्यूनंतर अंजप गावातील नागरिकांनी संताप व्यक्त करत मृतदेह घेण्यास नकार दिला आहे.

घटना घडून तीन तास उलटूनही कोणताही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणाचा निषेध करत उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन सुरू केले आहे. याच परिसरात महिनाभरापूर्वी ८ वर्षीय चिमुरड्याचा विद्युत तारेमुळे मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

'महावितरणचा भोंगळ कारभार अजून किती दिवस सुरू राहणार आणि आणखी किती निष्पाप जीव गेले की प्रशासन जागे होणार? म्हणून प्रश्न उपस्थित करीत आहेत. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासन काय कारवाई करते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

SCROLL FOR NEXT