Maharashtra weather : महाराष्ट्रात थंडी नेमकी कधी सुरू होईल? हवामानाचा अंदाज काय सांगतोय? जाणून घ्या

cold season update : महाराष्ट्रात थंडीबाबत महत्वाची अपडेट समोर आलीये. हवामान विभागाने थंडीबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
cold season
cold season updateSaam tv
Published On
Summary

राज्यात थंडी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यनंतर सुरू होईल, असा हवामान विभागाचा अंदाज

सध्या राज्यात परतीचा पाऊस थांबल्याने नागरिकांना उष्णतेचा अनुभव

१५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान काही भागांत वादळी पावसाचा अंदाज

या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

सचिन जाधव, साम टीव्ही

राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना उन्हाची झळ बसत आहे. तापमान वाढल्याने राज्यात नागरिकांना 'ऑक्टोबर हिट' देखील अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे राज्यात थंडी नेमकी कधी सुरू होईल? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. नागरिक ऑक्टोबर 'हिट'ने वैतागलेले असताना हवामान विभागाने थंडीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. नोव्हेंबर मध्यनंतर थंडी सुरू होईल, अशी शक्यता हवामान विभागाने सुरु केली आहे.

हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी राज्यातील वातावरणावर मोठं भाष्य केलं आहे. राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा २० टक्के पाऊस जास्त कोसळला. तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३९ टक्के जास्त पाऊस पडला. तापमानही सरासरीपेक्षा जास्त दिसत आहे. सकाळी कमी तापमान आहे. तर दिवसा जास्त उष्ण जाणवत आहे. जमीन शोषून घेतलेल किरण परावर्तित होतात, त्यामुळे उत्तरेकडून येणारी कोरडे वारे यामध्ये परिणाम होत आहे'.

'राज्यातील अनेक भागात 15 आणि १६ ऑक्टोबर रोजी वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, सर्वच भागात असं नाही, पण काही ठिकाणी होईल. १७ ऑक्टोबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट आहे. मेघ गर्जनेसह पाऊस होईल. मान्सून राज्यातून बहुतांश भागातून परतला असला तरी हा पाऊस मान्सूनचा नाही. हा वादळी पाऊस असून मान्सूनचा पाऊस नाही', असंही त्यांनी सांगितलं.

cold season
Ajit Pawar : कुठलंही काम शंभर टक्केच करतो, अन्यथा...; अजित पवारांचं शरद पवारांसमोर जोरदार भाषण

थंडी कधी सुरु होणार?

'राज्यात डिसेंबर,जानेवारीमध्ये थंडी सुरु होते. मात्र, नोव्हेंबरमध्ये तापमान कमी होताना दिसेल. सरासरीपेक्षा कमी तापमान आता दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतर थंडी सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

cold season
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत दुरावा? शिंदे गटाच्या नेत्याचं भाजपला ओपन चॅलेंज,'याल तर सोबत, नाहीतर...'

'राज्यात 20 टक्के पाऊस जास्त झालाय. विभागीय पद्धतीने विश्लेषण केले तर कोकण गोव्यात 15 टक्के जास्त झाला आहे. मध्य महाराष्ट्रात 20 टक्के जास्त पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा 39 टक्के पाऊस जास्त झाला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 14 टक्के पाऊस जास्त झाला आहे. मागील एक दोन वर्षातला हा पाऊस जास्त आहे असं म्हणू शकतो, असे हवामान तज्ञ्ज म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com