Ajit Pawar : कुठलंही काम शंभर टक्केच करतो, अन्यथा...; अजित पवारांचं शरद पवारांसमोर जोरदार भाषण

Ajit Pawar Latest Speech : अजित पवारांचं शरद पवारांसमोर जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी कुठलंही काम शंभर टक्केच करतो, असं ठणकावून सांगितलं.
Ajit pawar News
Ajit pawar Saam tv
Published On
Summary

अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एका व्यासपीठावर

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पार पडली महत्त्वाची बैठक

बैठकीत साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतीच्या नुकसानीवर चर्चा

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार पु्न्हा एकदा एका व्यासपीठावर आले. शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांनी जोरदार भाषण केलं. 'आपण कुठलेही काम शंभर टक्केच करतो, अन्यथा करत नाही, असं अजित पवार म्हणाले. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत बोलत होते.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची महत्वाची बैठक झाली. १६३ कारखान्याचे प्रमुख पदाधिकारी आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या आढावा घेण्यात आला. बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे उपस्थित होते.

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे

जयंत पाटील, राजेश टोपे तुम्ही देखील शंभर टक्के लागवड करा. आपण केलं तरच लोकांना सांगू शकतो.

राज्यातील आठ साखर कारखान्यांना केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मदत करण्याचं सांगितलं आहे. केवळ त्या कारखान्यांच रेकॉर्ड चांगलं असलं पाहिजे अशी अट आहे.

यामध्ये कुठलेही राजकीय द्वेष न आणता चांगल्या कारखान्याची निवड केली जाईल.

अमित शहा कारखान्यातील इतर प्रकल्पांना कमी व्याजाने पैसे देणार आहेत.

Ajit pawar News
Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार काय म्हणाले?

वीएसआयच्या नियामक मंडळाची आणि राज्यातील साखर कारखाने मालक यांची एक बैठक पार पडली.

गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्यासोबत इतर चर्चा झाली. कारखान्यात एआयचा वापर याबद्दल सुद्धा चर्चा करण्यात आली. संस्थेने ५००० शेतकऱ्यांना १८ हजार रुपये हेक्टर असा भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

५००० शेतकरी मध्ये फर्स्ट कम बेसिसवर केला आहे. वीएसआय योजना यंदा केली आहे, पुढील वर्षी वेगळी योजना असेल. ५ रुपये पूरग्रस्त आणि १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधी यांना देण्यासाठी आवाहन केलं.

मुख्यमंत्री सहायता निधीमधून ही मदत केली पाहिजे, तर काय हरकत आहे, असा मुख्यमंत्री यांनी सूतोवाच केला होता. मतप्रवाह असतो, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे.

शेतकऱ्यांनी याबाबत काय निर्णय घेतला पाहिजे, याची माहिती आज देण्यात आली. शेतकऱ्यांनी आणि साखर कारखानदार यांनी ते करावे अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे

Ajit pawar News
Manoj Jarange : मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; सव्वा तास बंद दाराआड काय चर्चा झाली?

संग्राम जगताप यांच्याविषयी बोलले की, मी कालच सांगितलं होतं की नोटीस काढली जाईल. तुम्ही राजकीय पक्षाचे सदस्य असला तर तुम्ही विचारधारा सोडून बोलला तर नोटीस देणार'

रोहित पवारांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, मला बाकीच्या लोकांबद्दल बोलायचं नाही. मला काही फरक पडत नाही'.

Ajit pawar News
Political News : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निवडणुकीआधी २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा

शेतकरी मदतविषयी रोहित पवार म्हणाले, 'दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न आहे.जिथे जिथे पूरग्रस्त परिस्थिती होती, तिथून जिल्हाधिकारी यांचा रिपोर्ट आले आहेत का हे पाहिलं जाईल. मदत करण्याची जी तरतूद केली आहे, ती डीबीटी मार्फत थेट दिली जाईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com