नगर : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मोठी पीछेहाट झाली आहे. या निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्या लढाईकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. कर्जत जामखेडमधील ही निवडणूक शेवटच्या फेरीपर्यंत चालली. तांत्रिक बिघाडामुळे मतदारसंघातील मतमोजणी थांबवण्यात आली. त्यानंतर शेवटच्या फेरीत चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या मोजणीत रोहित पवार विजयी झाले.
यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांची चांगलीच धाकधूक वाढली होती. शेवटच्या फेरीत रोहित पवार अवघ्या १२४३ मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत रोहित पवारांचा निसटता विजय झाला. शेवटच्या फेरीत मोजणी करताना रोहित पवार स्वत: मतमोजणी केंद्रावर दाखल झाले होते. एका ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याने VVPAD वर मोजणी सुरु झाली होती. या मतदारसंघात कर्जत-जामखेड मतदारसंघात अतिशय काटे की टक्कर सुरु होती. त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं होतं.
कर्जत जामखेड मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत कल बदलत होते. एका फेरीत रोहित पवार आघाडीवर असायचे. तर दुसऱ्या फेरीत भाजपचे राम शिंदे आघाडीवर असायचे. त्यामुळे दोन्ही नेत्यांचं टेन्शन वाढलं होतं. या मतदारसंघात रोहित पवार यांच्या नावाचे डमी उमेदवार देखील रिंगणात उभे होते.
रोहित पवारांचं नाव साध्यर्म असणारा उमेदवार रिंगणात उतरला होता. त्या उमेदवारानेही या मतदारसंघात ३ हजार मते घेतली. तर या मतदारसंघात राम शिंदे यांच्या नावाशी साध्यर्म असणारी दोन उमेदवार रिंगणात होते. शेवटच्या २७ व्या फेरीत रोहित पवारांनी १२४३ मतांनी भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला.
विजयानंतर रोहित पवार म्हणाले, 'माझी लीड कमी होत गेली. मी पिछाडीवर गेलो. तेव्हा माझ्या कार्यकर्त्याला कळालं. तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचं निधन झालं. त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांना शांती मिळो. माझ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. आमच्याकडे नेते नव्हते. आमच्याकडे कार्यकर्ते होते'.
'खऱ्या अर्थाने ही कार्यकर्त्यांनी निवडणूक खांद्यावर घेतली. मी अनेक दिवस मतदारसंघाच्या बाहेर होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खांद्यावर घेतली. सामान्य लोक आणि कुटुंबीयांनी प्रतिसाद दिल्याने मी विजयी झालो. माझी निवडणूक झाली. आता कार्यकर्त्यांची निवडणूक असेन. मी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहीन', असे रोहित पवार पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.