महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची जादू पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुती २२१ जागांवर आघाडीवर आहे तर अनेक उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीमधील भाजप १२६ जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिममधून विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशामध्ये राज्यात भाजपला मिळणारे यश लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विधानसभा निवडणुक निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टवर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकीन है', या फक्त एका वाक्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाली असून दोघांनी देखील एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा आहेत. लँन्ड स्लाइड व्हिक्टरी असं म्हणत दोघांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. तसंच, लाडकी बहीण योजनेमुळे विजय झाला अशी दोघांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तर, भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचे मोठं विधान केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचे ताजे अपडेट इथं वाचा...
Maharashtra All Constituency Assembly Election results Updates
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.