Karjat Tripple Family Death Case Saam Tv
महाराष्ट्र

Karjat Crime: कर्जतमधील तिहेरी हत्याकांडात नवा ट्विस्ट, पोलिसांने केली मोठी कारवाई!

Karjat Tripple Family Death Case: कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करू त्यांचे मृतदेह नाल्यामध्ये फेकून देण्यात आला होते. याप्रकरणात आता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून मृतकाच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानेच हे हत्याकांड केल्याचे म्हटले जात आहे. मालमत्तेच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या कर्जत तालुक्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हत्या झालेल्या मदन पाटील यांचा भाऊ हनुमंतला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मालमत्तेच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा पोलिसांना संशय आहे. शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी कर्जतच्या पोशीर गावातील चिकनपाडा येथील मदन पाटील, त्यांची गरोदर पत्नी अनिशा आणि मुलगा विवेक या तिघांचे मृतदेह घराजवळील नाल्यात आढळून आले होते. या तिघांचीही धारधार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्यांचे मृतदेह नाल्यामध्ये फेकून देण्यात आले होते. या तिहेरी हत्याकांडामुळे कर्जत हादरले आहे.

दरम्यान, मदन यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह सापडला होता तेव्हा यांच्या मुलाच्या कपाळावर आणि त्यांच्या पत्नीच्या कानशिलावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले होते. घरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असताना या तिघांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेला मदन यांचा भाऊ देखील त्यांच्या घरामध्येच राहत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात अखेर दमदार पावसाने पुनरागमन

Nagpur : नागपूरमध्ये खळबळ! मदरसा शिक्षकाकडून १० अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; रात्रीच्या काळोखात भयंकर कृत्य

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; महायुतीकडून विश्वासघात झाल्याचा दराडेंचा आरोप

Marathi Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

SCROLL FOR NEXT