Raigad News : रायगड हादरलं, अल्पवयीन मुलावर वसतिगृहात लैंगिक अत्याचार

Physically abused minor boy in Mangaon Taluka : रायगडमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 लैंगिक अत्याचार
Raigad NewsSaam Tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही रायगड

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील तसंच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. रायगड जिल्ह्यामधये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. रायगड जिल्ह्यामध्ये एका वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीय.

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

याबाबत सविस्तर वृत्त असं की, रायगडमध्ये काल ३० ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर (Raigad Crime News) आलीय. वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनीच या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. तीनही मुलांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती मिळतेय.

माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

माणगाव तालुक्यातील जावळी येथील वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणाची गंभीर दखल रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने (Raigad News) घेतलीय. माणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात (physically abused minor boy) आलाय. या घटनेमुळे वसतीगृहातील इतर मुलांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण आहे. माणगाव पोलिसांनी तपासाची सुत्रं वेगाने फिरवली आहेत. पीडित मुलाची सध्या वैद्यकीय चाचणी केली जातेय. या घटनेमुळे मुलगा घाबरल्याचं समोर आलंय.

 लैंगिक अत्याचार
Dog Abuse in Kolkata : संतापजनक! 60 वर्षीय आजोबांचं किळसवाणं कृत्य; पाळीव कुत्रा घरात एकटा असल्याचं पाहून केलं...VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

वसतिगृहामधील एका खोलीत तीन अल्पवयीन विद्यार्थी राहत होते. यातील दोन मोठ्या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या रूममधील लहान मुलावर अतिप्रसंग केला. ही गंभीर बाब वसतिगृहाच्या अधिकारी (Crime News) आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नजीकचे पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी अलिबाग जिल्हा रुग्णालयात केली जाणार आहे. बालअत्याचाराच्या घटनेनं बदलापूर हादरलं, या घटनेचे पडसाद ताजे असतानाच आता रायगडमध्ये देखील ही धक्कादायक घटना घडलेली आहे.

 लैंगिक अत्याचार
Shahid Kapoor On Physical Abuse: धक्कादायक! लहानपणीच शाहीद कपूरचं झालंय फिजिकल अब्युज, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com