कर्डिले यांचे समर्थक गेले भाजप सोडून साम टीव्ही
महाराष्ट्र

कर्डिलेंचे कट्टर समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीत

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक नगरसेवक शहाजी जाधव (ठाकूर) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यापाठोपाठ राहुरी मतदारसंघातील धनगरवाडीचे (ता. नगर) सरपंच किशोर शिकारे यांनी चार ग्रामपंचायत सदस्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला.

नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आज (शनिवारी) नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा सरचिटणीस सुनील आडसुरे, राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार, रोहिदास कर्डिले, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, संजय साळवे, राष्ट्रवादी कला, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. श्याम शिंदे उपस्थित होते.

नगरसेवक जाधव (ठाकूर) म्हणाले, की मंत्री तनपुरे नगराध्यक्ष असताना विरोधी नगरसेवक म्हणून प्रभागात विकासकामांमध्ये कधीही दुजाभाव केला नाही. यापुढेही राष्ट्रवादीचे एकनिष्ठ काम करून, पक्षाची व मंत्री तनपुरे यांची ताकद वाढविण्यास मदत करू. जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले, की राहुरी पालिकेच्या आगामी निवडणुकीत विरोधकांना शून्यावर बाद करण्याचा मंत्री तनपुरे यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीकडे तरुण आकर्षित होत आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देणारा हा पक्ष आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीत प्रवेशाचा ट्रेंड सुरू झाला आहे.

मंत्री तनपुरे म्हणाले, की नगरसेवक जाधव (ठाकूर) तळागाळातील जनतेच्या समस्या समजून घेऊन काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या प्रभागात जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून, त्यांना राष्ट्रवादीत योग्य सन्मान मिळेल. नगर तालुक्यात ऊर्जाविषयक समस्या दूर करण्यासाठी नियोजनबद्ध काम चालविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपने शेवटच्या क्षणी काढलं मराठी कार्ड; मित्रपक्षाचा बडा नेताही फोडला

Maharashtra Live News Update: पतंग उडवताना इलेक्ट्रिक शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

Nail Art : ब्यूटी पार्लरसारखे नेल आर्ट करा आता घरच्या घरी, पाहा डिझाइन

SCROLL FOR NEXT