कोट्यवधींचे पॅकेज धुडकावून परदेशातून आला नि कलेक्टर झाला

विनायक नरवडे
विनायक नरवडेसाम टीव्ही नेटवर्क
Published On

अहमदगर : लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल लागल्यापासून विद्यार्थ्यांच्या यशाच्या वेगवेगळ्या कथा समोर येत आहेत. अशीच प्रेरणादायी कथा आहे नेवासा तालुक्यातील कुकाण्याच्या विद्यार्थ्याची. हल्ली बहुतांशी मुले उच्च शिक्षण घेऊन परदेशी जाऊन स्थायिक होण्याची स्वप्न पाहत असतात. मात्र, या विद्यार्थ्याचा प्रवास काहीसा उलटा आहे. तो अमेरिकेत नोकरीस होता. एक कोटींपेक्षाही जास्त त्याला पॅकेज होते. त्यावर पाणी सोडून तो भारतात आला नि कलेक्टर झाला, तोही पहिल्याच प्रयत्नांत.

नेवासे तालुक्यातील कुकाणे येथील विनायक कारभारी नरवडे असे त्याचे नाव. देशात ३७ वा तर राज्यात द्वितीय क्रमांक त्याने पटकावला आहे. या परीक्षेचा निकाल लागताच कुकाण्यात फटाके फोडण्यात आले. प्रसिद्ध डॉ. नरवडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. कारभारी नरवडे यांचा तो मुलगा आहे. Vinayak Narwade passes UPSC exam with 37 ranks

विनायक नरवडे
यूपीएससी दोनदा उत्तीर्ण, श्रीरामपूरच्या विद्यार्थ्याची कमाल

विनायक डॉक्टरचा मुलगा असल्याने त्याच्या यशाची किंमत कमी होत नाही. तो एमएस करून परदेशात कोट्यवधी रूपये कमावत होता. परंतु त्याने ठरवलं भारतात यायचं. काही जणांना त्याचा हा निर्णय रूचला नाही. परंतु तो त्याच्या विचारांवर ठाम होता.

त्याचे प्राथमिक शिक्षण येथील आठरे पब्लिक स्कूलमध्ये तर उच्च माध्यमिकचे शिक्षण सारडा महाविद्यालयात आणि उच्च शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे झाले. एम. एस. इंजिनिअरिंग अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले. त्यांनी तीन महिने दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास केला. मात्र, कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर त्यांना नगर येथे यावे लागले. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आल्याने त्यांनी पुन्हा त्याच उमेदीने अभ्यास करीत यूपीएससीचा गड राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होत सर केला.

विनायकचे ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, ॲड. देसाई देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, युवा नेते उदयन गडाख, नागेबाबा समूहाचे प्रमुख कडूभाऊ काळे, सरपंच लता अभंग यांनी केले. Vinayak Narwade passes UPSC exam with 37 ranks

प्लॅन बी हवा

विनायकने कोणताही खासगी क्लास लावला नव्हता. त्याच्याकडे पैसे असतानाही मुद्दामहून शिकवणी लावली नाही. प्रत्येकजणाने क्लास केला तरच यशस्वी होता येते, असे काही नाही. हे विनायकने दाखवून दिले. यूपीएससी किंवा एमपीएससी असो नाही तर कोणतीही स्पर्धा परीक्षा. प्रत्येकाचा प्लॅन बी तयार असायला हवा. माझ्याकडेही तो तयार होता. एवढेच काय तर प्लॅन सीही याचासुद्धा विचार केला होता. परंतु जे ध्येय गाठायचे त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी ते करण्याची तयारी हवी, तरच यश तुम्हाला मिळू शकते.

- विनायक नरवडे, (युपीएससीत देशात ३७व्या क्रमांकाने उत्तीर्ण परीक्षार्थी)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com