अहमदनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC)परीक्षा सर्वात कठीण मानली जाते. या परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारली तरी मोठे यश मानले जाते. परंतु श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरच्या विद्यार्थ्याने सलग दोनदा हा विक्रम केला आहे.
अभिषेक दिलीप दुधाळ असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मागील वर्षी त्याने ६३७ रॅंक मिळवत भारतीय रेल्वेत नोकरी मिळवली. तिथे प्रशिक्षण घेत असताना अभिषेकने या वर्षी पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देत ४६९ रॅंक मिळवली.
अभिषेकने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (EXAM) पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले होते. दोनदा परीक्षा क्रॅक करूनही त्याने कोणतीही शिकवणी लावली नव्हती. अभिषेकचे बेलापूर येथील प्राथमिक शाळा व खटोड माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत माहिती आणि तंत्रज्ञान विभागात अभिषेक यांनी पदवी प्राप्त केली होती. पदवीनंतर आयटीतील नोकरी सोडून प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्धार केला.
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) एम. ए. अर्थशास्त्र विभागासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला. प्रारंभी खासगी क्लास लावले नंतर SELF STUDY सुरू केला. गेल्या वर्षी रोज सात तास नियमित अभ्यास करुन अवघ्या २३ व्या वर्षी हे यश मिळवले. प्रशासकीय अधिकारी सुरज थोरात यांची प्रेरणा मिळाली. थोरात हे आयकर विभागात (ENCOME TAX) वरिष्ठ अधिकारी आहेत.
अभिषेकचे वडील येथील डहाणूकर माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. आई संगीता गृहिणी आहेत. भाऊ प्रणव शिक्षण घेत आहे. सलग दोनवेळा मिळालेल्या यशाबद्दल अभिषेकचे अभिनंदन होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.